Uday Samant sakal
कोकण

Uday Samant Death Threat: उदय सामंतांना जाळून मारण्याची धमकी; नाना पटोलेंच्या सभेतला प्रकार

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापुरातल्या सभेमध्ये ही घटना घडली आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी दिली आहे. (Uday Samant Death threat)

धमकी दिलेल्या या नेत्याचं नाव जोशी असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने दिलेल्या धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि पुढील चौकशीची ग्वाही दिली.

रिफायनरीचे विरोधक उदय सामंतांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT