Unusual firing at ratnagiri mobile vendors in ratnagiri kokan marathi news 
कोकण

रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर अचानक झाला गोळीबार अन....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील फडके उद्यान येथे प्रसिद्ध नॅशनल मोबाईल विक्रेता मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. अज्ञात पळून गेला. 
ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेने  शहरात खळबळ उडाली असून खंडणीसाठी हा प्रकार  घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. जखमी मनोहर ढेकणे यांना जिल्हा  शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.


घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल दुकानाचे मालक मनोहर ढेकणे हे फडके उद्यान जवळील लक्ष्मी-नारायण अपार्टमेंटमध्ये राहतात. त्याचा मोबाईल संवाद सुरू होता.  बििल्डंगखाली पार्किंगमध्ये दुचाकीजवळ ते बोलत असताना भरधाव चारचाकी मोटार तेथे आली. त्यातून एक संशयित खाली उतरला. 

हेही वाचा  - ...त्यामुळे झालीय शिवसेनेची कोंडी

त्याने अचानक त्यांच्यावर थेट गोळीबार केला. या हल्ल्यात मनोहर ढेकणे यांच्या पोटात गोळी लागली. ते खाली कोसळले.  फायरिंगच्या आवाजाने बाजूचे लोक गोळा झाले. त्यांचा मुलगा राहुल तेथे आला. त्याने फायरिंग करून पळून गेलेल्या लोकांचा पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. जखमी ढेकणे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबराची माहिती असताच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि त्यांचे सहकारी तातडीने घटना स्थळी पोचले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी पुराव्याच्या दृष्टीने झाडा झडती घेतली.  मात्र तिथे काहीच हाती लागले नाही.  पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक शिरीष सासणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले.  

सराईत गुन्हेगाराचे नाव पुढे 
चौकशी सुरू असून यात सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर याचे नाव प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तो नुकताच एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताच्या मागावर पोलिस पथक रवाना झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

Thane News: उंच टॉवर, स्नो पार्क, टाउन पार्क आणि... ठाण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार, भव्य प्रकल्पांची घोषणा

किती घाण दाखवताय... मराठी मालिकेतील नवऱ्याचा क्रूरपणा पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- आताचे पुरुष असे आहेत?

Pune Crime : फसवणूक प्रकरणात धनंजय वाडकर व त्याच्या जावयाच्या घरातून कागदपत्रे जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई!

Junnar Leopard Attack : ओतूरमध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी!

SCROLL FOR NEXT