Flyover Collapsed Video Esakal
कोकण

Flyover Collapsed Video: थोडक्यात बचावले! मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुल अपघातात अजित पवार गटाच्या आमदाराला दुखापत

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम थोडक्यात बचावले पण, त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना गर्डर कोसळल्याची धक्कादायक घडना घडली आहे. चिपळूणमधील बहादूर शेखनाका उड्डाणपुलावरील ही घटना आहे. सकाळच्या सुमारास गर्डरला तडे गेले होते, त्यानंतर दुपारी पूर्ण गर्डर कोसळला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम पाहणी करत असताना हा गर्डर कोसळला आहे.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम थोडक्यात बचावलेत. शेखर निकम यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बांधकाम सुरू असलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आमदार शेखर निकम गेले होते. पुलाच्या खाली उभे राहूनच ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. त्याचवेळी पुलाचा मोठा आवाज झाला. पूल कोसळत असल्याचं लक्षात आलं आणि काही क्षणात आमदार निकम यांच्यासह त्या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी बाजूला झाले.

त्यानंतर काही क्षणातच गर्डरसह उड्डाणपूल कोसळला. आमदार निकम यांच्यासह उपस्थित अधिकारी वेळीच बाजुला झाल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आमदार निकम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याला दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT