Vikrant Jadhav sakal
कोकण

रत्नागिरी : विक्रांत जाधवांची खंत; संस्कृती जपून पर्यटन विकास करण्याचे आवाहन

कांदळवन क्षेत्र निश्‍चित होण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव यांनी २०१२ मध्ये कांदळवनाचे क्षेत्र निश्चित करावे, कारण याची वाढ अनियंत्रित असते, असे सांगितले होते; परंतु आजपर्यंत असे क्षेत्र निश्चित केलेले नाही. त्यामुळे त्याचा फटका विकासकामांना बसत आहे. गुहागरमध्येही गॅलरीमुळे कासवांना धोका नसतानाही कासव बचावाचे कारण पुढे करण्यात आले आणि गॅलरी पाडावी लागली होती. याचा फटका पर्यटन विकासाला बसत असल्याचे आता दिसू लागले आहे, अशी खंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्हा पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे चौथ्या पर्यटन परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी श्री. जाधव म्हणाले, पर्यटन ही एक चळवळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संस्कृती जपून पर्यटन विकास करण्याकरिता साऱ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. मंदिरे, गडकिल्ल्यांचे जतन करण्याकरिता पर्यावरणही जपूया; परंतु त्यात काही अडचणी आल्यास पर्यायी मार्ग काढला पाहिजे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील फ्लोटिंग जेटी आणि उभारलेली गॅलरी पाडण्यात आल्याचे सांगितले. तसेच कांदळवनांमुळे चिपळूण, खेडला जोडणारा एक मोठा पूल होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त केली.

अल्पबचत सभागृहात झालेल्या परिषदेत व्यासपीठावर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उद्योजक शाळीग्राम खातू, इंद्रीजित नागेशकर, सुबोध गरूड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, संतोष कामेरकर आणि संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर उपस्थित होते. सुहास ठाकूरदेसाई आणि सुधीर रिसबूड यांनी सूत्रसंचालन केले.

व्यावसायिक दराने मागतात भाडे

गुहागरमध्ये बीच शॅकसाठी बघितलेली जागासुद्धा एमएमबीची आहे. त्यांना भाडे द्यायला तयार असूनही ते व्यावसायिक दराने भाडे मागत आहेत. दोन्ही विभाग शासनाचेच असताना अशाप्रकारे अडचणींमुळे पर्यटन विकासात अडथळे येत असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT