कोकण

Vidhansabha 2019 :  कणकवलीत पारकरांना शिवसेना देणार साथ - राऊत

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - "संदेश पारकर यांना भाजपकडून कणकवली विधानसभेचे तिकीट मिळालं तर शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि त्यांना विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळवून देईल,' अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली. 

भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांचा 51 वा वाढदिवस कार्यक्रम येथील भगवती मंगल कार्यालयात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राऊत बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, प्रमोद रावराणे, संदेश पटेल, समृद्धी पारकर, नीलम सावंत-पालव, लक्ष्मण रावराणे, अतुल बंगे, सुमेधा अंधारी, रूपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, मिलिंद साटम, श्रेया गावडे, संजय जगताप, अवधूत मालणकर, जयदेव कदम, सुभाष धुरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री. राऊत म्हणाले, ""कणकवलीकरांना धांगडधिंगाणा घालणारा आमदार नको तर सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा आमदार हवा आहे.'' 

प्रमोद रावराणे यांनी कणकवली मतदारसंघातील वैभववाडी तालुका संपूर्णपणे पारकर यांच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही दिली. कणकवली हे तर पारकरांचे होमपीच आहे. आता देवगड तालुक्‍यानेही पारकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. 

अतुल रावराणे यांनी पारकर यांचे लढाऊ नेतृत्व असल्याचे सांगताना, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यात पारकर नेहमीच आघाडीवर असल्याचे मनोगत मांडले. नीलम सावंत-पालव यांनी महिला भगिनींच्या सर्वच कार्यक्रम आणि उपक्रमांना संदेश पारकर यांनी भक्‍कमपणे साथ दिल्याचे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी संदेश पारकर यांच्या कार्याचे कौतुक केले. 

कणकवली मतदारसंघ नेहमीच सत्तेच्या विरोधात राहिला आहे. यंदा मात्र हे चित्र बदलायला हवे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असणार आहे. त्यामुळे इथेही युतीचाच आमदार असायला हवा. ज्यावेळी पक्षाकडून संदेश पारकर यांच्याबाबत विचारणा होईल. त्यावेळी माझा कौल त्यांच्या बाजूनेच असेल. 

- अजित गोगटे  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT