Sunil Tatkare
Sunil Tatkare 
कोकण

यंदाही दोघा तटकरेंनी घटवले सुनील तटकरेंचे मताधिक्य

सुनील पाटकर

महाड : खास करुन रायगड जिल्ह्यात वापरला जाणाऱ्या नामसाध्यर्म्याच्या फॉर्म्युल्याने मागील लोकसभा निवडणूकीत पराभव झालेल्या सुनील तटकरे यांना यावेळीही नामसाधर्म्याने मताधिक्याचा फटका दिला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या सुनील तटकरे यांचे तब्बल 13 हजार 878 मताधिक्य नामसाधर्म्य असलेल्या अन्य दोन सुनील तटकरे यांनी घटवले. 

यापूर्वीच्या सर्व निवडणूकांमध्ये रायगड जिल्ह्यात वापरला गेलेल्या नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करण्याचा फॉर्म्युला या लोकसभा निवडणूकीतही कायम होता. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मुख्य उमेदवारांसमोर नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याचा प्रयोग रायगडच्या राजकारणात सातत्याने केला जातो. या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे अनंत गिते, काँग्रेस आघा़डीचे सुनील तटकरे तर निवडणूक लढवत होते. अनंत गिते यांचे नामसाध्यर्म्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला. परंतु सुनील तटकरे यांचे नामसाध्यर्म्य असलेले सुनील पांडूरंग तटकरे व सुनील सखाराम तटकरे मात्र रिंगणात कायम राहिले.

2014 च्या लोकसभा निवडणूकीत रायग़ड मतदार संघात सुनील तटकरे याच्या विरोधात सुनील श्याम तटकरे नावाचा उमेदवार रिंगणात होता. त्यांनी तब्बल 9 हजार 849 मते मिळविली.तर  सुनील तटकरे 2 हजार 110 मतांनी पराभव पत्करावा लागला. शिवसेनेला पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी या निवडणूकीत रायगडातून एक तर रत्नागिरीतून एक नामसाध्यर्म्य असलेले असे दोन सुनील तटकरे उभे केले. यावेळी मात्र नामसाध्यर्म्याची खेळी चालली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघा़डीचे सुनील तटकरे 31 हजार मतांनी विजयी झाले परंतु सुनील पांडूरंग तटकरे 4 हजार 126 यांना व सुनील सखाराम तटकरे यांना 9 हजार 752  अशी एकूण मते पडली त्यामुळे तटकरे यांच्या विजयाचे मताधिक्य 13 हजार 878 मतांनी कमी झाले.

विशेष म्हणजे या दोन तटकरेंना प्रत्येकी 6 पोस्टल मते तर मिळालीच परंतु पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली व गुहागर अशा सर्वच ठिकाणात त्यांनी मते मिळवली आहेत. रायगडातील मतदारांबरोबरच नामसाध्यर्म्याच्या फॉर्म्युल्यानेही यावेळी अनंत गीते यांना हात दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT