water issue in ratnagiri mandangad 
कोकण

धक्कादायक सत्य ; पाणी टंचाईचे आराखडे कोटींचे; तरीही गावे टँकरग्रस्त

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड - मंडणगड तालुक्यात सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. भौगोलिक रचना डोंगराळ असल्याने सर्व पाणी उताराच्या दिशेने वाहून जात खाडीद्वारे समुद्राला मिळते. तालुक्यातील जलसंधारण नियोजनाला गळती लागल्याने भोळवली देवाचा डोंगर व कुडुक खुर्द गुजरकोंड ही गावे अजूनही टँकरग्रस्त असून त्यांना तुळशी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. 

तालुक्याचा पाणी टंचाई आरखडा १ कोटी ३९ लाखांचा असून त्यातील फक्त ४ पूरक योजनांना मान्यता मिळाली आहे तर १९ योजना प्रस्तावित आहेत. त्यामुळे तालुक्याचे टंचाई आराखडे दरवर्षी कोटींचे बनत असले तरी टँकरग्रस्त गावे तशीच असल्याचे चित्र आहे.

एप्रिल व मे महिन्यातील तीव्र टंचाईच्या झळा तालुक्यातील दोन गावातील तीन वाडय़ांना बसला आहे. पंचायत समिती मंडणगड यांच्यावतीने एप्रिल व मे महिन्याचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. १४ एलिल २०२० पासून तालुक्यातील तुळशी येथील धरणातून टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तालुक्यातील भोळवली देवाचा डोंगर, कुडूक खुर्द गुजर कोंड येथे येथे खाजगी वाहनाने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. देवाचा डोंगर येथील लोकवस्ती ३६० तर कुडुक खुर्द गुजर कोंड येथील लोकवस्ती २५० इतकी आहे. पाणी पुरवठा विभागाने पाणीपुरवठा आराखडा तयार केला असून  यात १९ गावातील नळपाणी पुरवठा योजनांपैकि ४ नव्या योजनांना  प्रशासकीय मान्यता  मिळाली आहे. १५ नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरूस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यांना अद्याप मान्यता  मिळाली नाही. पाणीटंचाईसाठी 1 कोटी ३९ लाख ३० हजार रुपयांचा कृती आराखडा  तयार करण्यात आला होता. यामध्ये  २० योजनांच्या दुरूस्ती करीता १ कोटी ५ लाख ६० हजार रुपये खर्च, २२ विंधन विहिरी करिता १३ लाख २० हजार रूपये, तात्पुरती योजना दुरूस्ती करीता १८ लाख ५ हजार,  टँकररव्दारे पाणी पुरवठा करणेसाठी २ लाख रुपयांची  मागणी  करण्यात आली आहे.  या पैकी केवळ ४ पूरक योजनांना मान्यता मिळाली असून अन्य १९ योजना प्रस्तावित आहेत. तालुक्यातील नदी, नाले, ओढे कोरडे पडले असून काही गावांतून विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांतून मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक परतले आहेत. परिणामी पाणी वापर वाढणार असून त्यासाठी पुरवठा करणारी प्रशासकीय व स्थानिक यंत्रणा सज्ज राहणे अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

Pune Mumbai Journey : पुणे-मुंबई प्रवास आता ९० मिनिटांत! नवीन द्रुतगती मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी

New Year Upday 2026: नवीन वर्षात 'या' खास उपायांचे शांतपणे करा पालन, वर्षभर आर्थिक समस्यांचा करावा लागणार नाही सामना

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT