water problem in khed ratnagiri kokan marathi news 
कोकण

या गावात पाण्याची भिषण समस्या : प्रशासनाचे दुर्लक्ष...

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : तालुक्यातील आंबवली-भिंगारा व चिंचवली-ढेबेवाडीतील उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. यामुळे आठवडाभरापूर्वी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी टँकरसाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मात्र अजूनही या दोन गाव -वाड्यांतील ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा आहे. सर्व्हेक्षणानंतरच पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

आठवड्यापूर्वीच टँकसाठी अर्ज

तालुक्यात दरवर्षी शिमगोत्सवात पाण्याचे चटके बसतात. यावर्षी मात्र मुबलक पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील पाणीटंचाई लांबणीवर पडली. मात्र आंबवली- भिंगारा व चिंचवली -ढेबेवाडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच टँकरसाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल होतात. यंदा 5 मार्चला आंबवली व चिंचवली ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरसाठी अर्ज केला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत चालले आहेत. 

सर्व्हेक्षणानंतर पाणीपुरवठा
टँकरसाठी अर्ज केलेल्या आंबवली व चिंचवलीचे प्रशासनाकडून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणानंतर दाखला उपलब्ध होताच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. 


यावर्षी टंचाई आराखड्यात 56 गावे 111 वाड्यांचा समावेश आहे. 1 कोटी 92 लाख खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यावर्षी 5362 मिमी इतक्या पावसाची नोंद झाल्याने उपलब्ध जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. मात्र रणरणत्या उन्हामुळे पाणी साठ्यात घट होत चालल्याने यंदाही पाणीटंचाईची समस्या रडकुंडीस आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT