Water Supply Through Tankers esakal
कोकण

Water Shortage : रत्नागिरीत भीषण पाणीटंचाई; 60 गावांतील 117 वाड्यांना टँकरने पाणी, 23 हजार लोकांना फटका

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ४२ गावातील ८५ वाड्यांतील १७ हजार ४५ लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : वाढत्या उन्हामुळं जिल्ह्यातील पाणीटंचाईची (Water Shortage) तीव्रता वाढली असून, २३ हजार १०९ लोकांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. सध्या ६० गावांतील ११७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply Through Tankers) केला जातो. गतवर्षीपेक्षा यंदा ३६ अधिक वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ४२ गावातील ८५ वाड्यांतील १७ हजार ४५ लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये भर पडली आहे. दुर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये टंचाईची झळ जाणवत आहे. या वेळेस उन्हाचा कडाका आणखीन काही दिवस राहण्याची शक्यता आहे. मान्सून लांबल्यास मेच्या अखेरीस टँकरग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा संभव आहे. जिल्ह्यात ११७ वाड्यांत पाणीटंचाई असूह आतापर्यंत टँकरच्या ५७७ फेऱ्याद्वारे पाणी पुरवण्यात आले.

राजापूर आणि गुहागर तालुके पाणीटंचाईपासून दूर आहेत. मात्र अन्य सात तालुक्यांतील टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आतापर्यंत टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यासाठी खेड तालुक्यात १३७, तर रत्नागिरी तालुक्यात १७३, चिपळूण तालुक्यात १०३ टँकरच्या सर्वाधिक फेऱ्या झालेल्या आहेत. त्याखालोखाल मंडणगड ३९, दापोली २०, संगमेश्वर ५६, लांजा ४९ टँकर फेऱ्यांचा समावेश आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ५२ गावांतील ८१ वाड्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

टंचाईग्रस्त गावांची स्थिती

  • तालुका गाव वाडी टँकर

  • मंडणगड ४ ६ १

  • दापोली ४ ५ १

  • खेड २२ ५० १

  • चिपळूण १० १३ २

  • रत्नागिरी ३ १२ ३

  • लांजा ३ ५ १

  • संगमेश्वर १४ २६ २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Alandi Traffic Issue : आळंदीत बेशिस्त पार्किंग व नियोजनाअभावी वाहतूक कोंडी; नागरिक हैराण

Chakur Robbery Case : महामार्गावरील दरोडा प्रकरणाचा उलगडा; एक आरोपी जेरबंद, १७.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

SCROLL FOR NEXT