sakal
कोकण

समुद्रात मासेमारीला जात असताना नौका गाळात रुतली

नौका दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समजताच स्थानिक मच्छिमारांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

आचरा: येथील बंदरातून समुद्रात मासेमारीला जात असताना नौका गाळात रुतली. नौका एका बाजूला कलंडल्याने आत पाणी शिरले. नौका दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समजताच स्थानिक मच्छिमारांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर नौकेसह 5 ही खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही घटना आज सकाळी 6.30 सुमारास आचरा समुद्रात नस्ताजवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आचरा बंदरातून विघ्नहर्ता मासेमारी नौका 5 खलाशीसह येथील बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात जात होती. खाडीतून समुद्रात जाताना ती नौका आचरा बंदर नस्तावर आली असता सुकती असल्याने तेथे साठलेल्या गाळात रुतली व इंजिन बंद पडले. त्यामुळे ती एका बाजूला कलंडली व नौकेत पाणी शिरु लागले.

दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच आचरा बंदरावरील मच्छीमार चावल मुजावर, मुजावर, असिफ मुजावर, वसीम मुजावर, रियान मुजावर, सतीश आचरेकर, व अन्य मच्छिमारांनी धाव घेत होड्यांच्या साह्याने अपघातग्रस्त नौका गाठली. आतील खलाशांना नौकेतून बाहेर काढत नौकेला व दोरखंड बांधून अडवण्यात आले. त्यानंतर नौकेत भरलेले पाणी काढून दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने दोरखंड बांधून अडकलेली नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू होते. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुर्घटनाग्रस्त नौका बाहेर आणण्यात मच्छीमारांना यश आले. नौकेच्या इंजीनात पाणी गेल्याने इंजिनाचे मात्र मोठे नुकसान झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT