Who Get Road Contracts Do Agitation Nationalist Accusation 
कोकण

रस्ताकामाचे ठेके घेणारेच करतात आंदोलन; राष्ट्रवादीचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर योग्य प्रकारे खड्डे बुजविण्यासाठी आम्ही गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करीत आहोत; मात्र ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट प्रकारे खड्डे भरले गेल्याने महामार्गाची चाळण झाली आहे. ज्यांनी महामार्ग कामाचे ठेके घेतले, त्यांनीच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पत्रकार परिषदेत केला. 

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि गटारावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर धडक दिली होती. आठवड्यात खड्डे न बुजवल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर जयंद्रथ खताते म्हणाले की, चार दिवसांपूर्वी आम्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. पावसाने उघडीप दिल्याने डांबराने खड्डे भरण्याची मागणी केली. तसेच शहरातून जाणाऱ्या गटारांची खोली वाढविण्याची मागणी केली होती. यापूर्वी कंपनीने पावसाळ्यापूर्वी महामार्गावर डांबरीकरण केले होते; मात्र ते डांबरीकरण निकृष्ट झाल्याने पहिल्याच पावसात डांबरीकरणाचे थर वाहून गेले. निकृष्ट कामाचा नाहक त्रास नागरिक, प्रवासी व वाहनचालकांना होतो. ठेकेदार कोण आहे, ते आम्हाला महत्त्वाचे नाही. योग्य दर्जाचे काम व्हावे, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. 

कामाचे ठेके राजकीय पुढाऱ्यांना... 

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अनेक राजकीय पुढाऱ्यांना कामाचे ठेके मिळाले आहे; परंतु ठेकेदार, पुढाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक दिली. शहरासह तालुक्‍यातील जनता त्यांचे राजकारण चांगलेच ओळखून आहे. 

रखडलेल्या कामांना चालना 

चिपळूण मतदारसंघात दहा वर्षांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा आमदार विजयी झाला. यापूर्वी आमदार, खासदार, पालकमंत्री सर्व विरोधकच असल्याने आमच्या मागण्यांना दाद मिळत नव्हती. आता राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाल्याने रखडलेल्या कामांना चालना मिळू शकेल. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण! सुनेत्रा पवारांनी उचललं कठोर पाऊल; आढावा बैठकीत निर्देश

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

SC On Pre Marriage: लग्नापूर्वी कुणावरही विश्वास ठेऊ नका; नातेसंबंधांत सजगता महत्त्वाची, न्यायालयाने का व्यक्त केली चिंता?

Pune News : महापालिकेत समाविष्ट २३ गावांसाठी दोन हजार कोटीचे कर्ज घेण्याची तयारी

SCROLL FOR NEXT