Legal Services Authority sakal
कोकण

दोन कोटींच्या मदतीने पीडितांचे मनोधैर्य वाढले

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडील प्रकरणे; ७४ प्रकरणे झाली मंजूर

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्याच्या (acid attack)गुन्ह्यातील पीडित महिला आणि बालकांना प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी ‘मनोधैर्य योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे(Ratnagiri District Legal Services Authority) १७७ प्रकरणे दाखल झाली. त्यांपैकी ७४ प्रकरणांमध्ये आतापर्यंत २ कोटी ५ लाख ४० हजार एवढ्या रकमेची भरपाई मंजूर (Compensation approved)केली आहे. ५३ प्रकरणांमध्ये नुकसानभरपाई नामंजूर केली आहे. ४९ प्रकरणे अंतिम नुकसानभरपाईसाठी प्रलंबित आहेत.

आतापर्यंत गुन्ह्यातील आरोपींना गुन्हा घडल्याचे शाबित झाल्यानंतर त्याचे अंतिम पर्यवसान शिक्षेमध्ये व्हायचे. परंतु गुन्ह्यातील पीडित किंवा त्याच्या वारसांना कोणताही दिलासा मिळत नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत घरकाम करणाऱ्या महिलांच्या मंचविरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर या याचिकेमध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे लैंगिक हिंसाचाराच्या घटनांना बळी पडलेल्या दुर्दैवी पीडित महिला किंवा बालके त्याचप्रमाणे दुसऱ्या एका याचिकेमध्ये अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्ती यांना अर्थसाहाय्यपान करण्याबाबतची योजना तयार करण्याबाबतचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७ अ हे नवीन कलम २००९ साली समाविष्ट केले आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाला न्यायालयाने शिफारस करणे अथवा गुन्ह्यातील आरोपी आढळून येत नसेल तर नुकसानभरपाईची रक्कम ठरवणे, पीडितांना नुकसानभरपाई देणे, यासाठी तरतूद केली.

एक नजर..

  1. प्रकरणे दाखलः १७७

  2. ७४ प्रकरणांमध्ये भरपाई मंजूरः २ कोटी ५ लाख ४० हजार

  3. अंतिम नुकसानभरपाईसाठी प्रलंबितः ४९ प्रकरणे

  4. नुकसानभरपाई नामंजूरः ५३ प्रकरणे

आरोपी आढळून येत नसेल तर..

पीडित नुकसानभरपाई योजनेनुसार आरोपी (criminal) आढळून येत नसेल तर थेट विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल करता येतो. परंतु त्यासाठी घडलेल्या गुन्ह्याबाबत पोलिस ठाण्यात(police stattion ) प्रथम खबर देणे बंधनकारक केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT