working of grampanyat is online in chiplun ratnagiri beneficial for village people 
कोकण

आता 50 किमीची पायपीट वाचणार ; ग्रामपंचायतींचा कारभार होणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : सह्याद्रीच्या खोऱ्यात व अतिशय दुर्गम भागात वसलेल्या खेड तालुक्‍यातील मुसाड, साखर - धामणंद, तळवट या गावांमधील ग्रामपंचायती अखेर बीबीएनएल (भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड)च्या लाइनने जोडल्या गेल्याने प्रथमच ऑनलाइन कारभार सुरू झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना तालुक्‍याच्या ठिकाणी 50 किलोमीटर अंतरापर्यंत नेहमी होणारी पायपीट आता करावी लागणार नाही. ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे मुसाड गावचे सुपुत्र व माजी सैनिक बाळकृष्ण सुर्वे यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. 

तालुक्‍यातील पंधरागाव विभागात आजही अनेक सेवासुविधा पोहचलेल्या नाहीत. अतिशय दुर्गम असलेल्या या भागात इतर सुविधांप्रमाणेच दूरध्वनी व भ्रमणध्वनीची सेवा या गावांमध्ये पोहचलेल्या नाहीत. त्याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय व शासकीय कामकाजासाठी खेंड येथे 50 किमीच्या अंतरावर जावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अशा परिस्थितीत येथील ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाइन सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे. 

पूर्वी खेड येथे एखाद्या सरकारी कामासाठी जाताना पूर्ण एक दिवस घालवावा लागत होता. आता केंद्राने सर्व ग्रामपंचायती, मुख्य शाळा, तलाठी कार्यालय व पोस्ट ऑफिसमध्ये भारत सरकारने अनिवार्य केलं आहे. त्यानुसार बीबीएनएल ब्रॉडबॅंड लाइनने जोडली जात आहेत. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले असले तरी ही सेवा अजूनही सुरू झालेली नाही. याविषयी माजी सैनिक सुर्वे यांनी पंतप्रधान व बीबीएनएल कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत. 

पंधरागाव विभाग डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांचा आहे. त्यामुळे या विभागात नेटवर्कचा प्रश्न कायम आहे. इंटरनेट सुरू झाल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज व ग्रामस्थांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे. या नेटवर्क केबलवरून काही खासगी कनेक्‍शनही जोडली जात आहेत. यामुळे गावच्या विकासात भर पडणार असून अशा कामांमध्ये तरुणांनी लक्ष घालणे आवश्‍यक आहे. 
- बालकृष्ण सुर्वे, माजी सैनिक मुसाड, खेड 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT