this year mango season late for 15 days due to changes in atmosphere in ratnagiri said farmers 
कोकण

यंदा आंब्याचा हंगाम लांबणार ?

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : गणेशोत्सवानंतर परतलेल्या पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर-जानेवारीत येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. परतीचा पाऊस आणि अवेळी पावसाचे सातत्य राहिल्यास यंदाचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा १५ दिवस लांबणीवर पडण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. असे घडल्यास त्याचा यंदाच्या बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात आणि त्यापूर्वी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला, तरी आंब्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरला होता. त्यातून आंब्यांच्या झाडांना चांगलीच पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यामध्ये आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. मात्र, गणेशोत्सवानंतर काही दिवस विश्रांती घेतलेला वरुणराजा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मागे फिरला आहे. त्यातून, गेल्या काही दिवसांपासून अवेळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका भातकापणीच्या कामांना जसा बसत आहे तसाच आंब्यालाही बसत आहे.

पावसाच्या सातत्याने मोहोरापूर्वी आंब्यांच्या झाडांना आलेली किंवा येत असलेली पालवी कुजण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम डिसेंबर-जानेवारीमध्ये येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर होऊन मोहोर येण्याचा हंगाम नेहमीच्या तुलनेमध्ये पंधरा दिवस उशिरा लांबणीवर पडण्याची शक्‍यता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. 

"काही आंबा कलमांना पालवी आली. काही झाडांना पालवी येण्याची स्थिती आहे. अशा स्थितीत पाऊस आल्याने ही पालवी कुजण्याची शक्‍यता वाटते. त्याचा परिणाम आंब्याच्या येऊ घातलेल्या मोहोरावर होईल. यंदा आंब्याला मोहोर नेहमीपेक्षा पंधरा दिवस उशिरा येण्याची शक्‍यता आहे."

- विजय मोहिते, आंबा बागायतदार

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT