Ratnagiri Police Selfie Sea esakal
कोकण

Ratnagiri : सेल्फी काढताना पश्चिम बंगालच्या तरुणाचा रत्नागिरी समुद्रात बुडून मृत्यू; जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न झाला, पण..

धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

दगडांमध्ये सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटेने तो समुद्रात ओढून वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न झाला; परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.

रत्नागिरी : धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. शहरातील भगवती बंदर ब्रेकवॉटर वॉल येथे समुद्रात सेल्फी काढताना लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

रविवारी (ता. १) घटना घडली. बुडालेल्या तरुणाचा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढला. अल्लाउद्दीन नसिरूद्दीन मोंडल (वय १९, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मोंडल हा हार्बर अटलांटिक फिश एक्स्पोर्ट या कंपनीत कामाला होता. रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने तो मित्रासोबत भगवती बंदर येथील ब्रेकवॉटर वॉलवर गेला होता. तिथे फिरत असताना समुद्राच्या पाण्याजवळ गेला आणि या धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह त्याला अनावर झाला.

दगडांमध्ये सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटेने तो समुद्रात ओढून वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न झाला; परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. याबाबत त्याचा मित्र राकीबुल इस्लाम साहेब अली मोल्ला याने फोन करून अल्लाउद्दीन मोंडल पाण्यात वाहून जात असल्याचे सांगितले.

तसे कंपनीतील इतर कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अल्लाउद्दीनला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोंडलला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT