Youth gathered for government college konkan sindhudurg 
कोकण

युवाशक्ती एकवटली, कृती समितीलाही पाठिंबा, काय आहे कारण? वाचा...

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी आता युवाशक्ती पुढे आली आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीला पाठिंबा दिला असून जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, कुडाळ व वेंगुर्ले नगराध्यक्ष, सरपंच, गटविकास अधिकारी यांना हे महाविद्यालय व रुग्णालय तत्काळ व्हावे, यासाठी लेखी निवेदने देऊन पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. 

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व्हावे यासाठी तालुक्‍यातील पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांना सावंतवाडी येथे सौरभ आईर, मुन्ना आजगाकर, सच्चिदानंद ठाकूर, रोशन राऊळ, विनय वाडकर, शुभम घावरे यांनी लेखी निवेदन सादर केले. तर दोडामार्ग येथे अभिमन्यू गवस, राजेश कोरगावकर, मिलिंद नाईक, गोविंद टेंबकर, प्रभाकर मयेकर, हर्षद तंबुळकर, बाळकृष्ण कोरगावकर, विशाल चव्हाण, समीर शिरोडकर व नवकिरण युवा मंच सुरुची वाडी दोडामार्गच्या सदस्यांनी दोडामार्ग पंचायत समितीसह सरपंच गटविकास अधिकाऱ्यांना निवेदने दिली.

कणकवली येथे लक्ष्मण गावडे, नितीन तावडे, दिग्विजय राणे, प्रथमेश वरवडेकर, संदेश सावंत यांनी निवेदन दिले. मालवण येथे सायली आचरेकर, स्वाती पारकर, निधी मुणगेकर. देवगड येथे सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सचिव पुर्वा सावंत, आरती धुरी, स्वप्नाली वाल्मिकी यांनी तर कुडाळ येथे जय पडते, आशिष राऊळ, विवेक बोभाटे, शंकर पंदारे, ज्ञानेश सरनोबत, महादेव शिरोडकर, दैवेश रेडकर, मोहन मांजरेकर, रमाकांत नाईक यांनी दिले. वेंगुर्ले येथे यशवंतगड शिवप्रेमी ग्रुपचे रुपाली परब, वैशाली वडर, अभिषेक रेगे, भुषण मांजरेकर, सरोज परब, सुकन्या परब, सौरभ नागोळकर, संपदा राणे सिंहगर्जना ग्रुप वेंगुर्ले साईप्रसाद भोई, राहुल मरुडेकर, सौरभ धुरी, अमित नाईक, प्रणव वायगणकर, रोहन नाईक, सुरज मालवणकर, चिन्मय डूबळे वेताळ प्रतिष्ठान ग्रुप, तुळसचे सचिन परुळकर, महेश राऊळ, विवेक तिरोडकर, प्रशांत सावंत, किरण राऊळ, निखिल ढोले, सोनाली आंगचेकर, वैभव होडावडेकर, प्रसाद परुळकर यांनी निवेदने दिली. 

मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
निवेदने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृती समिती जिल्हा सिंधुदुर्गकडून मुख्यमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधींना दिली आहेत. जन जागरण करून 25000 नागरिकांनी पोस्ट कार्ड व 130 ठराव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यांनी पारीत केलेले ठराव सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्कालिन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. 15 ऑगस्ट 2019 साली लाक्षणिक उपोषणही प्रांताधिकारी कार्यालय येथे केले. जिल्ह्यातील नागरिकांनी मेलवरून आपली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही पोचवली आहे. 

मुख्यमंत्रीही सकारात्मक 
मुख्यमंत्रीही सकारात्मक असून त्यांनी 19 जूनला कोविड टेस्ट लॅब लोकार्पणवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयची मागणी पूर्ण करू असे सांगितले. याचा पुनरुच्चार 3 जुलैला झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सवेळी केला व त्याचवेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते, की महिन्याभरात सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळसमोर येईल. मंत्रिमंडळ मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असून मुख्यमंत्री व सरकार सकारात्मक असताना जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही मागणी लावून धरण्यासाठी निवेदन दिल्याचे सांगण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT