rice crop
rice crop esakal
कोकण

चिपळूण : पेरणी केलेल्या भाताला धरला चांगला वापसा

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : पाऊस वेळेवर पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली; परंतु मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून ढगांकडे टक लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला. दुसऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांची खरिपासाठीची लगबग सुरू झाली. त्यानंतर पावसाने दडी मारली. पेरणी केलेल्या भाताला चांगलाच वापसा धरला आहे. त्याला पाणी मिळाले नाही तर भाताची रोपे करपण्याची भीती आहे.

तालुक्यात काही प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस झाला. नंतर पावसाने दडी मारली. मॉन्सूनच्या आगमनासाठी अजून काही दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सरासरी १०० मि. मी. पाऊस पडेपर्यंत तसेच जमिनीमध्ये दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत खरिपातील शेतीची कामे सुरू करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे. साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा कालावधी समजला जातो. यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन व सरासरीच्या १०० टक्के

पर्जन्यमान होणार असल्याचे भाकीत हवामान वेधशाळेने वर्तवले होते. सध्या मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत असल्याचे वेधशाळेकडून जाहीर करण्यात आले; परंतु प्रत्यक्षात पाऊस होत नाही. ८ ते १२ जून दरम्यान वेगवान वाऱ्यासह मुसळदार पाऊस होण्याचा इशारा दिला होता. तोही फोल ठरला आहे. काही शेतकऱ्यांनी पूर्वमोसमी पावसावरच भातपेरणी केली होती. त्यानंतर दोन दिवस झालेल्या पावसामुळे भातरोपे उगवली आहेत. ती चांगली वाढली आहेत; मात्र पाऊस नसल्यामुळे कडक उन्हात ती करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

अलीकडे हवामान खात्याने वर्तवलेले अंदाज खरे ठरले आहेत. यावर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामानखात्याने वर्तवला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी पूर्वमोसमी पावसावर भातपेरणी केली; परंतु पाऊस अचानक गायब झाल्यामुळे भातरोपे करपण्याची भीती आहे.

- विनायक राजेशिर्के, सावर्डे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT