esakal
क्रीडा

एका वर्षात दोनदा रंगणार IPL चा थरार, फॉरमॅटदेखील तयार?

एका वर्षात दोन वेळा आयपीएलचा थरार रंगणार; दिग्गज क्रिकेटरने केली भविष्यवाणी

धनश्री ओतारी

गेल्याच आठवड्यात आयपीएल १५ व्या सीझनची सांगता झाली. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने राजस्थानचा सात विकेट्सने पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. आयपीएलचा सीझन संपला असला तरी क्रिकेट प्रेमी अजुनही आयपीएलच्या फिव्हर आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यासाठी आनंदाची माहिती समोर आली आहे. एका वर्षात दोन वेळा आयपीएलचा थरार रंगणार असल्याची भविष्यवाणी माजी दिग्गज क्रिकेटरने केली आहे.

आयपीएलच्या चर्चेदरम्यान टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेट आकाश चोप्रा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात एक वर्षात दोन वेळा आयपीएल खेळवण्यात येणार आहे. आणि या विधानात तथ्य असल्याचेही चोप्रा यांनी म्हटलं आहे.

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना चोप्रा यांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमध्ये काही बदल करण्यात आलं आहेत. त्यावरुन असे संकेत मिळतात की, आयपीएल ही स्पर्धा खुप मोठी असेल. मात्र, या गोष्टीला ५ वर्ष लागतील. पण नक्कीच एका वर्षात दोनदा आयपीएल खेळवण्यात येणार आहे.

या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार २ आयपीएल

यंदाच्या सीझनमध्ये १० संघानी सहभाग घेतला होता आणि ७४ सामने खेळवण्यात आले होते. जर वर्षातून दोनदा आयपीएल खेळवण्यात आली तर ९४ मॅच खेळवण्यात येतील. आयपीएलची स्पर्धा लहान असेल जिथे संघ एकमेकांविरुद्ध फक्त एकच सामना खेळत असतील, हे छोटे आयपीएल एका महिन्यात संपू शकते. असे मतदेखील चोप्रा यांनी यावेळी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT