Joe Root  esakal
क्रीडा

कोहली-विल्यमसन पेक्षा हा खेळाडू आहे श्रेष्ठ; बीसीसीआयच्या माजी सिलेक्टरचं विधान

इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूटने रविवारी इतिहास रचला.

धनश्री ओतारी

इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूटने रविवारी इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात जो रूटने आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पाही गाठला. अशी कामगिरी करणारा जो रूट हा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या या खेळीचे कौतुक होत असतानाच बीसीसीआयच्या माजी सिलेक्टरने मोठं वक्तव्य केलं आहे.

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर जो रुटचा हा पहिलाच कसोट सामना होता. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पहिल्याच कसोटीत रुटने १० हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या या कामगिरीनंतर क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे माजी सिलेक्टर सबा करीम यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या काळात फॅब ४ मध्ये जो रुट टॉपवर आहे. विराट कोहली, स्टीव स्मिथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन त्याच्यांपेक्षा जो रुट सर्वश्रेष्ठ आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये करीमने रुटच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. जेव्हा आपण इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल बोलतो तेव्हा रुटचे नाव आपसुकच तोडांत येते. याचा अर्थ तो स्वतःच्या हिंमतीवर खेळत आहे. त्याला कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचा आधार नाही.

जर आपण भारतीय संघाबद्दल बोलायचे म्हटलं तर विराट कोहलीला नेहमी केएल राहुल, रोहित शर्मा, ऋषभ पंत यांचा सपोर्ट आहे. हीच परिस्थिती न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघातदेखील आहे. भारत असो किंवा श्रीलंका परदेशी मैदानात जो रुट एकटा फटकेबाजी करत मॅच जिंकवून देतो.

तसेच, चौथ्या इनिंगमध्ये शतक ठोकणे सोपे नाही. ट्रेंट बोल्ट, कायल जॅमीसन, कॉलिन डी ग्रैंडहोम यांसारखे गोलंदाज न्यूझीलंडकडे आहेत. जर कोणी चौथ्या इनिंगमध्ये दमदार फलंदाजी करत असेल तर तो खेळाडू टेक्नीकल आणी मानसिक दृष्ट्या तंदरुस्त आहे. असे मत करीमने व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT