Afghanistan Cricket Team Twitter
क्रीडा

Afghanistan Taliban crisis : टी-20 वर्ल्डकप संदर्भात मोठी अपडेट

होय.. आम्ही टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहोत. या स्पर्धेसाठी तयारी सुरु आहे.

सुशांत जाधव

Afghanistan Taliban crisis : अफगाणिस्तानमधील वातावरण चांगलेच तापले आहे. तालिबानने देशातील अनेक ठिकाणांवर कब्जा केलाय. याठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली तालिबानी संघटनेकडून सुरु आहेत. दिवसेंदिवस अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळत असताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची तयारी दर्शवली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मीडिया मॅनेजर हिकमत हसन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची टी-20 वर्ल्ड कपसंदर्भातील भूमिका मांडलीये. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी बोर्ड आपल्या सर्व खेळाडूंना ऑस्ट्रेलिया किंवा वेस्ट इंडिजला पाठवण्याचा विचार करत आहोत. यामध्ये काही अडथळा येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

हिकमत हसन म्हणाले की, होय.. आम्ही टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहोत. या स्पर्धेसाठी तयारी सुरु आहे. काही दिवसांतच उपलब्ध असणारे खेळाडू काबूलमध्ये सरावासाठी एकत्रित येतील. सध्याच्या घडीला आम्ही ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजसह तिरंगी लढतीसाठी ठिकाण निश्चित करत आहोत. ही मालिका आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल. तिरंगी मालिकेच्या स्थळासंदर्भात श्रीलंकेसह मलेशियातील पर्यायावर विचार सुरु असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. हंबनटोटा येथील पाकिस्तान विरुद्धची नियोजित मालिका खेळण्याचीही तयारी केली असून देशांतर्गत क्रिकेटमधील टी-20 च्या माध्यमातून आगामी वर्ल्ड कपसाठी तयारीचा प्लॅन आखला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अफगाणिस्तानमध्ये राजकीय खळबळ माजली असताना अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी देशाबाहेर आहेत. या दोन्ही खेळाडूंसह अफगाणिस्तान बोर्डाने संपर्क केलाय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आम्ही नेहमीच खेळाडूंच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी तयार असतो. खेळाडूंना आणि कुटुंबियांना ज्या गोष्टीची मदत लागेल ती देण्यासाठी आम्ही तयार आहोत. काबूलमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही कामावर परतोय. यासंदर्भात चिंता करण्याची काहीच गरज नाही, असेही ते म्हणाले.

आगामी टी 20 वर्ल्डसाठी दोन गटात टीमची वर्गवारी करण्यात आलीये. 20 मार्च 2021 पर्यंतच्या रँकींगच्या आधारावर टीमचे वर्गवारी करणअयात आलीये. गत चॅम्पियन वेस्टइंडिज, इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पहिल्या ग्रुपमध्ये आहेत. तर भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. या टीमशिवाय पात्रता फेरीतून प्रत्येक गटात दोन-दोन संघ पात्र ठरतील. पात्रता फेरीतील अ गटात श्रीलंका,आयर्लंड, नेदरलंड आणि नांमीबीया या चार संघांचा समावेश असून ब गटात बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनीची आणि ओमन या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील टॉपच्या दोन संघांना ग्रुप 16 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT