Ashes defeat England Cricket Board sack coach Chris Silverwood
Ashes defeat England Cricket Board sack coach Chris Silverwood  esakal
क्रीडा

Ashes: जाईल्स गेला, सिल्वरवूड यांचीही गच्छंती आता कॅप्टन रूटचा नंबर?

अनिरुद्ध संकपाळ

लंडन: अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियाकडून झालेला दारूण पराभव इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (England Cricket Board) चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आधी खेळाडूंच्या आयपीएल (IPL) खेळण्यावर टाच आणलेल्या सीबीने आता मॅनेजमेंटकडे वक्रदृष्टी वळवली आहे. कार्यकारी संचालक अश्ले जाईल्स (Ashley Giles) यांच्या राजीनाम्यानंतर आता संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (Chris Silverwood) यांची देखील गच्छंती केल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची ही कारवाई प्रशिक्षक (England Cricket Team Coach) सिल्वरवूड यांच्यापर्यंतच मर्यादित राहते की गच्छंतीची कुऱ्हाड कर्णधार जो रूट (Joe Root) याच्यावर देखील कोसळते हे येणारा काळच सांगेल.

दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टॉम हॅरिसन (Tom Harrison) यांनी अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले 'ख्रिस सिल्वरवूड यांनी त्यांच्या कार्यकाळात यश मिळवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांच्याबरोबर काम करत असताना संघातील खेळाडू आणि स्टाफने ते काम एन्जॉय केले. ख्रिस सिल्वरवूड यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या पुरूष संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळातच इंग्लंड संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कसोटीत देखील संघाने चांगली कामगिरी करत काही मालिका जिंकल्या. यात यशस्वी दक्षिण आफ्रिका दौरा आणि श्रीलंका दौऱ्याचा समावेश आहे.' असे म्हणत त्याने सिल्वरवूड यांच्या कामाचे कौतुक केले.

सीईओ टॉम हॅरिसन यांनी पुढे सांगितले की, इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यु स्ट्रॉस (Andrew Strauss) हा वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघाचा काळजीवाहू प्रशिक्षक असेल. दरम्यान, सिल्वरवूड यांनी देखील खेळाडू, स्टाफ यांच्याप्रती आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, 'इंग्लंडचा प्रशिक्षक होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. इंग्लंड संघातील खेळाडू आणि स्टाफ यांच्याबरोबर काम केल्याचा मला अभिमान आहे. त्यांनी जे कष्ट घेतल्या त्यासाठी त्यांचे आभार. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा.'

ख्रिस सिल्वरवूड पुढे म्हणाले की, 'गेली दोन वर्षे आव्हानात्मक होती पण, संघाबरोबरचा वेळ मी एन्जॉय केला. जो रूट आणि मॉर्गन बरोबर काम करण्याचा देखील आनंद घेतला. मी काही चांगल्या आठवणींसह या संघातून बाहेर पडत आहे. आता मी घरच्यांबरोबर चांगला वेळ घालवणार आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या अटकेबाबत केजरीवालांच्या बाजूनं निकाल येणार का? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT