Ajinkya Rahane Out of Team India 
क्रीडा

IND vs AUS: मुंबईच्या खेळाडूवर किती दिवस अन्याय? कसोटीत 4931 धावा तरी दिली नाही संधी

निवड समितीने घेतला धक्कादायक निर्णय! मुंबईच्या या खेळाडूची कारकीर्द संपवली

Kiran Mahanavar

Ajinkya Rahane Out of Team India : भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायची आहे.

या दोन संघांविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने संघ जाहीर केला आहे. जवळपास 1 वर्षापासून भारतीय संघाचा भाग नसलेल्या खेळाडूला या संघात स्थान नाही, परंतु अलीकडच्या काळात या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलिया मालिकेतून संघात पुनरागमन करण्याची त्याच्यासाठी मोठी संधी होती, पण त्यातही तो अपयशी ठरला. अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाचा भाग बनू शकलेला नाही. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

अजिंक्य रहाणेने टीम इंडियाकडून शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. बांगलादेश दौऱ्यावर निवड झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाले की, आम्ही रहाणेवर लक्ष ठेवून आहोत. तोही आमच्या योजनेत आहे. अजिंक्य रहाणेने नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्येही 191 धावांची इनिंग खेळली होती, मात्र देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही तो संघात पुनरागमन करू शकलेला नाही.

अजिंक्य रहाणेने भारतीय संघासाठी 82 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतकांसह 4931 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने अनेक वेळा टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे. टीम इंडियाने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात 2-1 ने मालिका जिंकली होती. त्यावेळी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे होता. त्या दौऱ्यात त्याने शतकही झळकावले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT