Ajinkya Rahane stand-in captain  of Historic Australia Tour Statement About credit
Ajinkya Rahane stand-in captain of Historic Australia Tour Statement About credit  esakal
क्रीडा

रहाणेचे ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत मोठे विधान; क्रेडिट दुसराच घेऊन गेला!

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) अखेर बोलला! अजिंक्य रहाणेने आपले उपकर्णधारपद गेल्यानंतर आणि कसोटी संघातील आपले स्थान डळमळीत झाल्यानंतर अखेर आपले मत व्यक्त केले आहे. अजिंक्य रहाणेने बॅक स्टेज विथ बोरया या कार्यक्रमादरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील (Historic Australia Tour) ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचे श्रेय कोणी दुसराच घेऊन गेल्याचे सांगितले. अजिंक्य रहाणेने या वक्तव्यावेळी कोणाचे नाव घेतलेले नाही. मात्र त्याचा रोख तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. (Ajinkya Rahane stand-in captain of Historic Australia Tour Statement About credit)

भारताच्या 2022-21 च्या ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा वैयक्तिक कराणाने दौरा अर्धवट साडून मायदेशात परतला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणेने हरणाऱ्या संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ऐतिहासिक मालिका विजय साकारला होता. या दौऱ्याबाबत आता अजिंक्य रहाणेने मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, 'मला माहिती आहे की मी तेथे काय केलं आहे. मला कोणाला सांगण्याची गरज नाही. हा माझा स्वभावही नाही. मात्र काही वेळा मी मैदानावर, ड्रेसिंग रूममध्ये घेतलेल्या निर्णयायचे श्रेय कोणी दुसराच घेऊन गेला.' हा दावा रहाणेने बॅकस्टेज विथ बोरया (Backstage With Boria) या कार्यक्रमकादरम्यान केला. तो पुढे म्हणाला की, 'माझ्यासाठी मालिका जिंकणे गरजेचे होते. ती ऐतिहासिक मालिका होती. ती माझ्यासाठी खास होती.'

याच कार्यक्रमात रहाणे म्हणाला की, 'मालिका विजयानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आणि विजयाचे श्रेय घेणे माध्यमांमध्ये येऊन सांगणे की हे मी केलं, हा माझा निर्णय होता. असं काही लोक बोलत होते. माझ्या बाजूने मला माहिती होतं की मैदानावर मी काय निर्णय घेतले होते.' तो पुढे म्हणाला की, 'होय याविषयी आम्ही व्यवस्थापनाशी बोलत होतो. पण, ते मी हसण्यावारी घालवले. मी माझ्या स्वतःबद्दल फारसे बोलत नाही. किंवा माझी स्तुती देखील करत बसत नाही. पण, मी तेथे काय केलं होतं हे मला माहिती आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: आमदार टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजितदादांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; काय झाली चर्चा?

HSC Result: बारावीत सर्व विषयात १०० टक्के गुण मिळवून तनिषानं घडवला इतिहास! असा केला अभ्यास

Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

BSE Market Cap: भारतीय शेअर बाजाराने रचला इतिहास; बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

Pune Accident: आरोपी अल्पवयीन तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले? धक्कादायक आकडा समोर

SCROLL FOR NEXT