Ajit Chandila Life Ban
Ajit Chandila Life Ban esakal
क्रीडा

Ajit Chandila Life Ban : मॅच फिक्सिंगचे आरोप झालेल्या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूवर BCCI मेहरबान; आजीवन बंदी उठवली

अनिरुद्ध संकपाळ

Ajit Chandila Life Ban : भारतीय क्रिकेट वर्तुळात 2013 मध्ये स्टॉप फिक्सिंगचे मोठे प्रकरण गाजले होते. त्यातील राजस्थान रॉयल्स संघाचे तीन खेळाडू अजित चंदिला, एस. श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. यातील श्रीसंत आणि अंकित चव्हाणवरची बंदी बीसीसीआयने आधीच उठवली होती. आता अजित चंदिलावरील आजीवन बंदी देखील उठवली.

आयपीएल 2013 मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अजित चंदिलावर आजीवन बंदी घातली होती. ही बंदी बीसीसीआयचे लोकपाल विनीज सरन यांनी सात वर्षांची केली. ही बंदी 2016 पासून लागू झाली होती. याबाबत सरन यांनी सांगितले की,

'बीसीसीआयने अजित चंदिलावर 17 - 05 - 2013 मध्ये सर्व क्रिकेट स्पर्धांमधून निलंबीत केले होते. त्याच्याविरूद्धची गुन्हेगारी कार्यवाहीशिवाय बीसीसीआयने त्याच्यावर शिस्तभंगाची देखील कारवाई केली होती. त्यानंतर अजितने अपील केली होती की त्याला देखील श्रीसंत आणि अंकित चव्हण सारखी समान वागणूक मिळावी. ही त्याची अपील मान्य केली जात आहे.'

सरन आपल्या वक्तव्यात पुढे म्हणतात की, 'बीसीसीआय शिस्तपालन समितीने 2016 मध्ये लागू केलेला आजीवन बंदीचा आदेश आता 7 वर्षाच्या बंदीपर्यंत केला जात आहे.'

बीसीसीआयने 2017 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने श्रीसंतवरील बंदी हटवली होती. त्यानंतर त्याने 2022 मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत केरळचे प्रतिनिधित्व केले होते. तर बंदी उठवल्यानंतर अंकित चव्हाण मुंबईच्या एका क्लबकडून क्रिकेट खेळला. आता बंदी उठल्यानंतर अजित चंदिला क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परततो की नाही हे पहावे लागेल.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT