Alex Hales Retirement  esakal
क्रीडा

Alex Hales Retirement : भारताचं टी 20 वर्ल्डकप स्वप्न तोडणाऱ्या अ‍ॅलेक्स हेल्सने केली निवृत्तीची घोषणा

अनिरुद्ध संकपाळ

Alex Hales Retirement : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या इंग्लंडच्या संघातील महत्वाचा खेळाडू अ‍ॅलेक्स हेल्सने आज तात्काळ प्रभावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. हेल्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही जवळपास 12 वर्षाची आहे. त्याने 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्या दमदार खेळीमुळे भारताचे फायनल गाठण्याचे स्वप्न भंगले होते. (T20 Cricket)

अ‍ॅलेक्स हेल्सने भारताविरूद्ध 2011 मध्ये टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले होते. त्याने आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत इंग्लंडकडून 75 टी 20, 70 वनडे आणि 11 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र त्याला टी 20 क्रिकेटमध्ये विशेष यश प्राप्त झाले. त्याने टी 20 मध्ये आक्रमक फलंदाजी केली. 2012 मध्ये तो इंग्लंडकडून पहिले वहिले टी 20 शतक झळकावण्यापासून अवघी 1 धाव दूर राहिला होता.

अ‍ॅलेक्स हेल्सने आपली कारकीर्द टी 20 वर्ल्डकप विजेता खेळाडू म्हणून संपवलं. त्याने इंग्लंडने जिंकलेल्या 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मोलाचे योगदान दिले होते. त्याने भारताविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात नाबाद 86 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावरच इंग्लंड फायनलमध्ये पोहचला.

मात्र हेल्सला 2019 च्या वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाकडून खेळता आले नव्हते. तो ड्रग टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे त्याला बेंचवर बसून संघ सहकाऱ्यांना ट्रॉफी उचलताना पाहत बसावे लागले होते.

हेल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो जगभरातील टी 20 लीग खेळण्यास मोकळा झाला आहे. या वर्षी सुरूवातीला हेल्सने इंग्लंडच्या बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली होती. त्याने त्या ऐवजी पाकिस्तान सुपर लीग खेळण्यास प्राधान्य दिले होते.

हेल्सने इंग्लंडसाठी वनडेमध्ये दोन मोठ्या खेळी केल्या आहेत. इंग्लंडने 2016 मध्ये पाकिस्तानविरूद्ध 444 धावांचा डोंगर उभारला होता. त्यात हेल्सने 171 धावांची खेळी केली होती. 2018 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात 481 धावा केल्या होत्या. त्यात हेल्सचा 147 धावांचा वाटा होता.

हेल्स हा कधीकाळी जगातील नंबर वनचा टी 20 फलंदाज होता. त्याने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 10 फ्रेंचायजी आणि इंग्लंडकडून मिळून एकूण 405 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 11 हजाराच्या वर धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट 147 इतके आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT