Alex Steele play cricket with oxygen cylinder esakal
क्रीडा

Alex Steele Cricket oxygen cylinder : क्रिकेटचं वेड... 83 वर्षाचा तरूण पाठीवर 'श्वास' घेऊन घेतोय आयुष्याचा आनंद

अनिरुद्ध संकपाळ

Alex Steele play cricket with oxygen cylinder : एकदा का तुम्ही खेळाडू झालात की तुम्ही आयुष्यभर खेळाडूच असता! हे वाक्य सार्थ ठरवणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय. क्रिकेट म्हटलं की ते खेळायला वय, जागा, मैदान लागतंच असं काही नाही. तुम्ही एका छोट्या बोळात देखील क्रिकेटचा खेळ मांडू शकता.

क्रिकेटचा आनंद हा फक्त तरूणच घेतात असं नाही तर वृद्ध लोकं देखील तितक्यात आनंदाने क्रिकेटचा आनंद घेतात. असाच आनंद 83 वर्षाच्या स्कॉटिश खेळाडूने स्थानिक क्लबच्या सामन्यात आपली क्रिकेट खेळण्याची हौस पूर्ण केली.

विशेष म्हणजे या 83 वर्षाच्या तरूणाने पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेत क्रिकेटचा आनंद लुटला. त्यामुळे त्यांचा जगभरातून कौतुक होत आहे. (Cricket Viral Video)

या मनाने तरूण असलेल्या क्रिकेटपटूचं नाव आहे एलेक्स स्टील! त्यांना 2020 मध्ये श्वसनाचा आजार झाल्याचं समजलं. त्यावेळी ते जास्तीजास्त एक वर्ष जगतील असं सांगण्यात आलं होतं. (Cricket Inspirational Story)

एलेक्स यांनी फोर्फशारय क्रिकेट क्लबकडून एक क्लब क्रिकेटर म्हणून स्कॉटलँडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलं. त्यांनी 1967 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ओल्ड ट्रॅफर्डवर लंकशायरविरूद्ध पदार्पण केलं होतं. ते 60 च्या दशकात स्कॉटिश संघाकडून नियमीत क्लब क्रिकेट खेळले. त्यांनी 1969 मध्ये देखील 8 सामने खेळले.

एलेक्स स्टील यांनी 14 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यांनी 24.84 च्या सरासरीने 621 धावा केल्या आहेत. विकेटकिपर म्हणून त्यांनी 11 झेल पकडले आहेत. तर 2 स्टम्पिंग केले आहेत.

स्टील यांना आता श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचा स्तर कमी होतो. मात्र अशा परिस्थितीत देखील ते पाठीवर ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन मैदानात उतरले. ते याबाबत बोलताना म्हणाले की, मी माझ्या आजारपणाबद्दल फार विचार करत नाही.

ते म्हणतात की प्रत्येक आजारपणात तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे हे महत्वाचे असते. मी अशा अनेक लोकांना पाहिलं आहे जे जुन्या गोष्टी उगाळत बसतात. मात्र मी तसं करत नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT