Allu Arjun Pushpa The Rise film craze in Bangladesh Premier League Esakal
क्रीडा

VIDEO: पुष्पा सारखं आता बांगलादेशी क्रिकेटरही म्हणतोय, झुकेगा नही मैं!

अनिरुद्ध संकपाळ

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा द राईज (Pushpa The Rise) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अल्लू अर्जूनचा एक डायलॉग आणि सीन फारच गाजला आहे. या सीनची कॉपी अनेक सेलिब्रेटी करत आहेत. क्रिकेटच्या (Cricket) मैदानातही याची जबरदस्त क्रेझ दिसत आहे. पहिल्यांदा रविंद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) अल्लू अर्जून सारखा लूक करत 'पुष्पा पुष्पराज झुकेगा नही मैं!' हा डायलॉग म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) देखील पुष्पाची नक्कल केली होती. (Allu Arjun Pushpa The Rise film craze in Bangladesh Premier League)

आता पुष्पा चित्रपटातील डायलॉग आणि आयकॉनिक अॅक्शनची क्रेझ बांगलादेशपर्यंत (Bangladesh) पोहचली आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजाने पुष्पा सेलिब्रेशन केले. या गोलंदाजाला षटकार मारण्याच्या नादात फलंदाज झेलबाद झाला त्यावेळी या बांगलादेशी गोलंदाजाने पुष्पा सेलिब्रेशन केले.

तेलगू अॅक्शन चित्रपट पुष्पा द राईज हा १७ डेसिंबरला प्रदर्शित झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) ३५० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. याचबरोबर पुष्पा हा २०२१ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. तर तेलगू चित्रपट सृष्टीतील हा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT