Mohammed Siraj T20 World Cup
Mohammed Siraj T20 World Cup esakal
क्रीडा

Mohammed Siraj : शमी एकटाच नाही तर सिराज, शार्दुलही जाणार ऑस्ट्रेलियाला

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj T20 World Cup : भारतीय संघाचे प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे निकामी झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून पाहण्यात येणाऱ्या मोहम्मद शमीने कोरोनावर मात करत फिटनेस टेस्ट देखील पास केली आहे. तो आता ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे संघ व्यवस्थापन मोहम्मद शमीबरोबरच मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur)देखील ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे. यामुळे बुमराहची रिप्लेसमेंट कोण याबाबतची उत्सुकता अजूनच ताणली गेली आहे.

माध्यमांमध्ये आलेलेल्या वृत्तानुसार मोहम्मद शमी (Mohammed Shami), मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर हे 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्याची शक्यता आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे निवडसमितीसमोर मोहम्मद सिराज की मोहम्मद शमी अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे सिराजचे ऑस्ट्रेलियातील ट्रॅक रेकॉर्ड देखील दमदार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून सिराजच्या नावाची घोषणा देखील होऊ शकते. याबाबतची घोषणा काही दिवसातच होईल. भारताने आयसीसीला 15 ऑक्टोबरपर्यंत आपल्या संघातील बदलासह अपडेटेड संघ कळवणे गरजेचे आहे. त्यामुळे बीसीसीआय 15 ऑक्टोबरपूर्वी जसप्रीत बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार टी 20 वर्ल्डकप संघाचा गोलंदाजीतील बॅक अप प्लॅन स्टँडबाय खेळाडू दीपक चाहर पाठदुखीमुळे टी 20 वर्ल्डकपला मुकला आहे. भारत टी 20 वर्ल्डकपमध्ये आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार असून हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर होईल. यापूर्वी भारतीय संघ 17 आणि 19 ऑक्टोबरला अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबत आपला सराव सामना देखील खेळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT