Alzarri Joseph Shine West Indies Defeat Zimbabwe In T20 World Cup 2022 Qualifier esakal
क्रीडा

WI vs ZIM :झिम्बाब्वेविरूद्ध विंडीजने विजय आणला खेचून! सुपर 12 च्या आशा कायम

अनिरुद्ध संकपाळ

Alzarri Joseph West Indies vs Zimbabwe : झिम्बाब्वेने वेस्ट इंडीजला 153 धावात रोखल्यानंतर दोन वेळा टी 20 वर्ल्डकप जिंकणारी विंडीज पात्रता फेरीतच गारद होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र विंडीजच्या गोलदाजांनी आपल्या फलंदाजांचे अपयश झाकत जोरदार पुनरागमन केले. त्यांनी झिम्बाब्वेचा डाव 122 धावात संपवत आपला पहिला विजय साकारला. याचबरोबर पात्रता फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्कीही टाळली. विंडीजकडून अल्झारी जोसेफने 4 षटकात 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर अनुभवी होल्डरने 12 धावांमध्ये 3 बळी टिपले. विंडीजकडून जॉन्सनल चार्ल्स 36 चेंडूत 45 धावा केल्या. तर रोव्हमन पॉवेलने 21 चेंडूत आक्रमक 28 धावा करून संघाला 153 धावांपर्यंत पोहचवण्यास मदत केली.

वेस्ट इंडीजला 153 धावात रोखल्यानंतर झिम्बाब्वेने आपल्या डावाची आक्रमक सुरूवात केली. 2 षटकात 29 धावांपर्यंत मजल मारून झिम्बाब्वेने विंडीजचे टेन्शन चांगलेच वाढवले होते. मात्र अल्झारी जोसेफने कर्णधार रेगिस चकाब्वाला 13 धावावर बाद केले. त्यानंतर जोसेफनेच टोनी मुनयोंगाला 2 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. मॅकॉयने विलियम्सला 1 धावेवर बाद करत झिम्बाब्वेला बॅकफूटवर ढकलले. दरम्यान, होल्डरने 19 चेंडूत 27 धावा करणाऱ्या विजली मॅधवेरेची विकेट घेत झिम्बाब्वेला मोठा धक्का दिला.

58 धावांवर 4 फलंदाज बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेची सर्व मदार अनुभवी सिकंदर रझावर होती. मात्र ओडेन स्मिथने त्याला 14 धावांवर बाद करत झिम्बाब्वेचा मॅच विनर माघारी धाडला. यानंतर विंडीजने सामन्यावर आपली पकड मजबूत करत झिम्बाब्वेची अवस्था 15.3 षटकात 8 बाद 102 अशी केली. मात्र तळातील फलंदाज ल्युक जाँगवेने 22 चेंडूत 29 धावांची आक्रमक खेळी करत कडवा प्रतिकार करण्यास सुरूवात केली. परंतु अल्झारी जोसेफने त्याचा त्रिफळा उडवत हा कडवा प्रतिकार मोडून काढला. जोसेफची ही आजच्या सामन्यातील चौथी शिकार होती. अखेर होल्डरने चताराचा 3 धावांवर त्रिफळा उडवत विंडीजचा विजय निश्चित केला.

झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजला 153 धावात रोखले. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी 10 षटकात 1 बाद 77 धावांवर असणाऱ्या वेस्ट इंडीजची अवस्था 6 बाद 101 धावा अशी केली. सिकंदर रझाने 4 षटकात 19 धावा देत 4 बळी टिपले. विंडीजकडून जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक 45 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT