Angelo Mathews Time Out Shakib Al Hasan Controversy
Angelo Mathews Time Out Shakib Al Hasan Controversy esakal
क्रीडा

Time Out : शाकिबकडून 'जंटलमन्स' गेमचा खून; केली ऐतिहासिक चूक

अनिरुद्ध संकपाळ

Angelo Mathews Time Out Shakib Al Hasan Controversy : भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत सेमी फायनलमधील आपला खुट्टा अजून बळकट केला. या सामन्यानंतर आता उरलेल्या वर्ल्डकपमधील सामन्यांकडे भारतीय चाहते एक औपचारिकता म्हणूनच पाहत होते. मात्र बांगलादेशने आज दिल्लीत एक मोठं कांड केलं अन् सर्व क्रिकेट चाहते पुन्हा एकदा वर्ल्डकपबद्दल बोलू लागलेत.

बांगलादेश आणि श्रीलंका यांचे यंदाच्या वर्ल्डकपमधून तसंही पॅकअप झालं आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यात कोणाला फारसा रस नव्हता. मात्र बांगलादेशचा सतत वादात राहणारा कर्णधार शाकिब अल हसनने आज एक ऐतिहासिक चूक केली अन् हा सामना सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला.

सामन्याच्या 25 व्या षटकात शाकिबमुळं श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजच्या नावासमोर एक विचित्र टॅग लागला. मॅथ्यूज हा क्रिकेट इतिहासातील टाईम आऊट होणारा पहिला फलंदाज ठरला. ज्यावेळी मॅथ्यूज टाईम आऊट झाल्याची बातमी आली त्यावेळी सुरूवातीला याचं खूप आश्चर्य वाटलं, मजा वाटली, मॅथ्यूजवर दया देखील आली. मात्र ही या क्षणिक करमणुकीनंतर शाकिबचा राग यायला लागला.

खूनी शाकिब हे पाप कुठं फेडणार?

घटनेच्या खोलात गेल्यावर मॅथ्यूजला क्रीजवर पोहचण्यास हेलमेटमुळे वेळ झाला. हे कारण त्यानं शाकिबला देखील सांगितलं. पंचांनी देखील शाकिबला दोन वेळा तुझी अपील मागे घेणार का असं विचारलं मात्र त्याने स्पष्ट नकार दिला. नियमानुसार मॅथ्यूज बाद होता. मात्र जंटलमन्स गेम म्हणून ओळख मिळवणाऱ्या क्रिकेटमध्ये टाईम आऊट होण्याची यापूर्वी कधी घटना घडली नाही कारण त्यावेळी क्रिकेटमधला 'जंटलमन'पणा जिवंत होता.

मात्र शाकिबने त्याचा आज खून केला. शाकिबला पंचांनी दोनवेळा आपली ऐतिहासिक चूक सुधारण्याची संधी दिली. मात्र उन्मादी शाकिबला माती खायचीच होती, त्याने ती खाल्ली. मॅथ्यूजनं आदळ आपट करत मैदान सोडलं. मात्र त्याच्या मैदान सोडण्याबरोबरच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेटमधील नागिन डान्सवाली राव्हलरी आता एका वेगळ्या अन् विषारी स्तरावार पोहचली आहे.

विराटकडून हावभाव नाही तरी खिलाडूवृत्ती करा कॉपी

सध्या क्रिकेट हे वेगवान झालं आहे. क्रिकेटमधील स्पर्धात्मकता टिपेला पोहचली आहे. याचा ब्रँड अम्बॅसिडर हा विराट कोहलीच आहे. विराटची आक्रमकता आणि विरोधी संघावर कायम वरचढ राहण्याचा त्याचा अॅप्रोच सर्वांनाच भावणारा आहे. मात्र विराट जरी आक्रमक हावभाव करून सेलिब्रेशन करत असला तरी तो खिलाडूवृत्ती देखील तितक्याच आक्रमकपणे मैदानात दाखवत असतो.

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या दोन खेळाडूंमधील नातं सर्वांना माहिती आहेच. मात्र ज्यावेळी स्मिथ सँडपेपरमधील बॅन भोगून परतला त्यावेळी प्रेक्षकांनी त्याची टर उडवली होती. मात्र अनेक वर्षापासून तथाकथित दुष्मन असलेल्या विराट कोहलीने प्रेक्षकांना दरडावत खेळभावनेला गालबोट लावण्यापासून रोखलं होतं. त्यानं असं अनेकवेळा केलं आहे.

नुकतेच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरबाबत देखील प्रेक्षक आपली मर्यादा ओलांडत होते. त्यावेळी देखील विराट कोहलीनेच प्रेक्षकांना थांबवण्याचं काम केलं होतं. विराट कोहलीचे हे गुण शिकण्यासारखे आहेत.

रोहित शर्माने देखील मोहम्मद शामीला थांबवलं

खिलाडूवृत्ती दाखवण्यात कर्णधार म्हणून रोहित शर्माचा दाखला देखील देता येतो. श्रीलंकेच्या संघाला याची प्रचिती आली होती. याच वर्षी श्रीलंकेविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार शानका हा आपल्या शतकापासून अवघ्या दोन धावा दूर होता.

श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या षटकातील तो चौथा चेंडू होता. शानका नॉन स्ट्राईकवर होता. मात्र मोहम्मद शामीने शानकाला नॉन स्ट्राईकर रन आऊट (मंकडिंग) केले. त्यावेळी रोहित शर्माने शामीसोबत त्वरित चर्चा करून आपली अपील मागे घेतली. पुढच्या चेंडूवर स्ट्राईकवर आलेल्या शानकाने चौकार मारून आपले शतक पूर्ण केलं. जरी भारतीय संघातील अश्विन मंकडिंगची जोरदार वकिली करत असला तरी रोहितने शामीला आपल्या निर्णयापासून परावृत्त करत खेळ भावनेला सर्वोच्च महत्व दिलं होतं.

न्यूझीलंड - दक्षिण अफ्रिका खिलाडूवृत्ती वाखाण्याजोगी

न्यूझीलंडने आतापर्यंत एकही वर्ल्डकप जिंकलेला नाही. त्यांना 2019 च्या वर्ल्डकपमध्ये ती संधी होती. मात्र आयसीसीच्या एका नियम आणि निर्णयामुळे ही संधी हुकली. मात्र चरित्रच शांत असलेल्या न्यूझीलंडने हा निर्णय देखील शांततेने स्विकारला.

दक्षिण अफ्रिका देखील कधीही अशा कोणत्या वादात आढळल्याचे दिसून येत नाही. त्यांचे खेळाडू जर कॅच झाला नसेल तर तो झालेला नाही असं स्वतःहून सांगतात अन् खिलाडूवृत्तीचे उदाहरण घालून देतात. नुकतेच भारताविरूद्धच्या सामन्यात देखील मार्को यान्सेनने एक झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू पुढे पडलेला पाहून त्याने स्वतःहून हा कॅच क्लीन नाही असं सांगितलं होतं.

शेवटी क्रिकेट असो वा कोणताही खेळ, तो खेळभावना राखूनच खेळायला हवा. क्रिकेटमध्ये असे अनेक नियम आहेत जे तुमच्या खिलाडूवृत्तीची परीक्षा पाहत असतात. आज याच परीक्षेत बांगलादेशचा कर्णधार आणि त्यांचा संपूर्ण संघ नापास झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जसं कर्म असतं त्याचं फळ देखील तसंच मिळतं. मॅथ्यूजला बाद करणाऱ्या शाकिबला मॅथ्यूजने याच सामन्यात 82 धावांवर बाद केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT