Angelo Mathews  esakal
क्रीडा

Angelo Mathews : लेट लतीफ अँजेलो मॅथ्यूजनं इतिहास रचला; क्रिकेट इतिहासात टाईम आऊट होणारा ठरला पहिला फलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

Angelo Mathews Time Out : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात मोठा राडा झाला. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट करण्यात आले. मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा पहिलाच फलंदाज ठरला. तो समरविक्रमा बाद झाल्यानंतर निर्धारित वेळेत पुढच्या चेंडूचा सामना केला नाही.

नियमानुसार, मॅथ्यूजला दोन मिनिटांत क्रीजवर पोहोचायचे होते आणि तीन मिनिटांत चेंडू खेळायचा होता. हेलमेट घेण्याच्या नादात तो 3 मिनिटात चेंडू खेळू शकला नाही. त्यामुळे मॅथ्यूजला टाईमआऊट बाद करण्यात आले. बांगलादेश संघाने अपील मागे घेतले असते तर मॅथ्यूजला खेळण्याची संधी मिळू शकली असती, पण शकिब अल हसनने तसे केले नाही.

शाकिब सामन्याचे 25 वे षटक टाकत होता. त्याने दुसऱ्याच चेंडूवर समरविक्रमाला बाद केलं होत. यानंतर श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज क्रीजवर येत होता. मात्र त्याला क्रीजवर येण्यात थोडा उशीर झाला. त्यात त्याच्या हेलमेटची स्ट्रीप तुटली होती. त्यामुळे तो हेलमेट बदलण्यासाठी थांबला होता. तो क्रीजवर पोहचला नाही.

त्याने बदली खेळाडूकडे दुसरे हेलमेट मागवले होते. तो अजूनही क्रीजवर पोहचला नव्हता त्यामुळे शाकिब अल हसनने टाईम आऊटची अपील केली. या परिस्थितीत पंचांची देखील पंचाईत झाली. कारण त्यांना नियम पाळणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांनी अँजेलो मॅथ्यूजला बाद ठरवलं.

मॅथ्यूज सारख्या 225 वनडे आणि शंभराच्या वर कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूच्या नावावर कारकिर्दीच्या या टप्प्यावर टाईम आऊट होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरण्याचा अप्रिय इतिहास जमा झाला.

दरम्यान, मॅथ्यूजने शाकिबला अपील मागे घेण्याची विनंती देखील केली होती. मात्र शाकिबने नियमावर बोट ठेवत अपील मागं घेण्यास नकार दिला. मात्र शाकिबच्या या निर्णयावर मॅथ्यूज नाराज झाला होता. त्याने मैदानाबाहेर येत आगपाखड केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT