Arshdeep Singh India Vs Pakistan T20 World Cup 2022 esakal
क्रीडा

Arshdeep Singh IND vs PAK : करारा जवाब! देशद्रोही म्हणणाऱ्यांना अर्शदीप सिंगने दिले चोख प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Arshdeep Singh India Vs Pakistan T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमारने सार्थ ठरवला. अर्शदीप सिंगने तर पाकिस्तानला सुरूवातीलाच मोठे दोन धक्के दिले. जवळपास एका महिन्यापूर्वीच आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्या सोपा झेल सोडल्यानंतर काही नतद्रष्टांच्या नजरेत तो देशद्रोही ठरला होता. मात्र मेलबर्नमध्ये त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची शिकार करत या नतद्रष्टाणा चोख प्रत्युत्तर दिले.

भारताने नाणेफेक जिंकून MCG च्या ग्रीन टॉपवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात फक्त 1 धाव दिली. त्यानंतर दुसऱ्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमला शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था 1 बाद 1 धाव अशी केली.

पाकिस्तानचा कर्णधार भोपळाही न फोडता माघारी गेल्यानंतर आता मदार मोहम्मद रिझवानवर होती. मात्र अर्शदीप सिंगने चौथ्या षटकात मोहम्मद रिझवानला देखली 4 धावांवर बाद करत दुसरा मोठा धक्का दिला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 4 षटकात 2 बाद 15 धावा अशी बिकट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा हट्ट अन् भिकेला लागले खेळाडू... BCCI शी पंगा घेणं पडलं महागात, याला म्हणतात 'तोंड दाबून बुक्क्याचा मार'...

Mohit Kamboj : १०३ कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण बंद ;मोहित कंबोज यांना पीएमएलए कोर्टाचा मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : कोकण रेल्वे मार्गावरील दिवा–सावंतवाडी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

'ठरलं तर मग'ने गड राखला पण 'या' मालिकेने हिसकावलं 'कमळी'चं स्थान; दुसऱ्या स्थानावर कोण, वाचा टॉप-१० मालिकांची यादी

‘झिम्मा’ ते 'मिसेस देशपांडे'; सिद्धार्थ चांदेकरच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद; खास ठरलं २०२५

SCROLL FOR NEXT