Ben Stokes Super Catch Twitter
क्रीडा

Video : बेन स्टोक्सचा अफलातून कॅच; व्हिडिओ व्हायरल

सुशांत जाधव

Ashes Australia vs England 2nd Test Day 4 : ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेडच्या ओव्हल मैदानात पुन्हा एकदा इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले आहे. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा डाव 9 बाद 230 धावांवर घोषित करत इंग्लंडसमोर 468 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बेन स्टोक्स (Ben Stokes) गोलंदाजीत चमक दाखवण्यात अपयशी ठरला. पण फिल्डिंगवेळी त्याने ही उणीव भरुन काढल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅविस हेडचा त्याने ज्यापद्धतीने झेल पकडला तो अप्रतिम असाच होता. सोशल मीडियावर स्टोक्सनं घेतलेल्या झेलची जोरदार चर्चा (Viral Video) रंगताना दिसत आहे.

चौथ्या दिवशीच्या खेळातील पहिल्या तासाभरात इंग्लंड गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतर लाबुशेने आणि हेड जोडीनं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर धावगती वाढवण्यासाठी ट्रॅविस हेडने एक मोठा फटका खेळला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 46 व्या षटकात ओली रॉबिन्सन याच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका खेळला. त्याचा हा फटका ऑस्ट्रेलियाच्या खात्यात किमाना चार धावा देऊन जाईल, असेच वाटत होते. पण बेन स्टोक्सने क्षेत्ररक्षणाजा सर्वोत्तम नजराणा दाखवून देत हेडच्या खेळीला ब्रेक लावला.

हेडनं पुल केलेल्या चेंडू डीप स्केअर लेगच्या दिशेने गेला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या स्टोक्सने अप्रतिमरित्या झेल पकडत हेडला तंबूचा रस्ता दाखवला. चेंडूच्या दिशेने पळत येऊन त्याने फुल लेंथ डाइव्ह मारत झेल पकडला. त्याच्या जागी अन्य कोणताही खेळाडू असता तर त्याने चार धावा रोखण्याचा प्रयत्न केला असता. पण बेन स्टोक्सने त्याठिकाणी इंग्लंडला विकेट मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. हेडने 54 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने 51 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ठेवलं 468 धावांच लक्ष्य

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 9 गड्यांच्या मोबदल्यात 473 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्यांनी 9 बाद 230 धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 236 धावांत आटोपला होता. त्यामुळे इंग्लंडसमोर आता सामना जिंकण्यासाठी 468 धावांचे लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ट्रॅविस हेडशिवाय मार्नस लाबुशेने याने 51 धावांची खेळी केली. कॅमरून ग्रीनने नाबाद 33 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT