Ashwin-Umpire-Fight 
क्रीडा

Viral Video: भरमैदानात राडा... अश्विन अन् अंपायरमध्ये खडाजंगी

प्रकरण तापणार असं दिसताच अजिंक्य रहाणे तेथे आला अन्... | IND vs NZ High Voltage Drama

विराज भागवत

प्रकरण तापणार असं दिसताच अजिंक्य रहाणे तेथे आला अन्...

IND vs NZ 1st Test Day 3 Live Updates : भारतीय संघाने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने त्यांच्या पहिल्या डावात दमदार फलंदाजी केली. न्यूझीलंडचे सलामीवीर विल यंग आणि टॉम लॅथम दोघांनीही अर्धशतके ठोकून संघाला भक्कम सुरूवात दिली. ८९ धावांवर असताना यंग बाद झाला. त्याला अश्विनने माघारी धाडलं. पण त्यानंतर एक वेगळीच गोष्ट घडली. मैदानावरील वादांसाठी अनेकदा चर्चेत असलेल्या अश्विनचा आजही वाद घडला.

रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता. त्यावेळी टॉम लॅथम आणि केन विल्यमसनला गोलंदाजी करताना अश्विन स्टंपच्या रेषेत येऊन गोलंदाजी करताना दिसला. पंच नितीन मेनन यांनी त्याला अशा पद्धतीने गोलंदाजी करण्यापासून रोखण्याचा प्रय़त्न केला. खेळपट्टीवरील डेंजर एरिया म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळ तो गोलंदाजी करत असल्याने त्याला हटकलं गेलं. पण क्रिकेटच्या नियमानुसार तो योग्य पद्धतीने गोलंदाजी करत होता. त्यामुळे पंच आणि अश्विन यांच्यात काहीसा वाद झाल्याचे दिसले. वाद विकोपाला जातो की काय अशी भीती असतानाच अजिंक्य रहाणेने मध्यस्थी करत प्रकरण सांभाळण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीचे बिहार कनेक्शन; मास्टरमाईंडच्या पत्नीला पाटण्यातून अटक

Lonavala Heavy Rain : चोवीस तासांत १३१ मिमी पाऊस; लोणावळ्यात जोरदार पावसाने सखल भाग जलमय

FIFA World Cup 2026 : पैशाने नाही विकत घेता येत गुणवत्ता; वर्ल्डकप फुटबॉलमधील सौदी, कतारच्या अपयशानंतर अधोरेखित

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी ४ वाजता सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT