Dinesh Karthik Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup : पंतच्या जागी दिनेश कार्तिकला का मिळाली संधी, जाणून घ्या 5 कारणे

रोहितने संघात युवा खेळाडूंपेक्षा अनुभवी खेळाडूंना दिले प्राधान्य

Kiran Mahanavar

Dinesh Karthik Asia Cup 2022 : आशिया चषकाचा दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने संघात युवा खेळाडूंपेक्षा अनुभवी खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. रोहितने युवा स्टार ऋषभ पंतला सामन्यातून बाहेर ठेवले आहे त्या जागी विकेटकीपिंगसाठी अनुभवी दिनेश कार्तिकची निवड केली.

पंतच्या जागी दिनेश कार्तिकला का मिळाली संधी, जाणून घ्या 5 कारणे

  • पंत आणि दिनेश कार्तिकचा अलीकडचा फॉर्म हे त्याचे एक कारण आहे. पंतची बॅट टी-20 मध्ये काही खास दाखवू शकली नाही. गेल्या 6 टी-20 सामन्यांपैकी एकाही सामन्यात त्याच्या बॅटला अर्धशतक करता आले नाही. T20 मध्ये पंत सातत्याने फ्लॉप ठरला आहे.

  • दिनेश कार्तिकने IPL-2022 मध्ये मिळवलेला फॉर्म सातत्याने कायम ठेवला आहे आणि त्याने संघासाठी अनेक उपयुक्त खेळी खेळल्या आहेत. तो सध्या फॉर्मात आहे आणि कोणत्याही आक्रमणाविरुद्ध धावा करू शकतो.

  • पंतकडे फिनिशर म्हणूनही पाहिले जात होते पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. दुसरीकडे दिनेश कार्तिक आयपीएल-2022 मध्ये फिनिशर म्हणून उत्कृष्ट खेळ दाखवत होता. टीम इंडियामध्ये आल्यानंतर त्याने येथेही चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या मॅच फिनिशिंग क्षमतेमुळे कार्तिकला पंतपेक्षा जास्त पसंती मिळाली आहे.

  • पंतला कार्तिकइतका T20 चा अनुभव नाही आणि हे देखील एक कारण आहे.

  • कार्तिकच्या खेळाने अलीकडच्या काळात जबाबदार वृत्ती दाखवली आहे आणि तो एक परिपक्व खेळाडूही आहे. कार्तिकला या मोठ्या सामन्यात संधी मिळाल्याचे हे देखील एक कारण आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन :

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, इफ्तिकार अहमद, खुशदील शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारीस रौफ, शहानवाज दहानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये आज प्रवेश; नाना पटोले म्हणाले- सत्तेतील पैशांतून खरेदी सुरुय

SCROLL FOR NEXT