Sourav Ganguly on Rohit Sharma sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : मालिकेवर फोकस करा! IND vs PAK सामन्यापूर्वी गांगुलीचा रोहितला सल्ला

आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 India vs Pakistan : झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिकेसाठी संपल्यानंतर भारतीय संघ आशिया कप 2022 साठी यूएईला जाणार आहे. चार वर्षांनंतर आशियाई वर्चस्वाची लढाई होणार आहे. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करणार आहे.

आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आशिया चषक ही भारत आणि पाकिस्तानमधील अशी मालिका नाही, त्यामुळे मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भारत पाकिस्तान हा आशिया कपमधील एक सामना आहे. गेल्या वर्षी झालेल्या 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते, ज्यात भारताचा 10 विकेट्सनी पराभव झाला होता.

आशिया कप आतापर्यंत 14 वेळा खेळल्या गेले आहे. भारताने 13 हंगामात भाग घेतला आणि सात वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर आशिया चषकाच्या इतिहासात 14 वेळा भारतीय संघाने पाकिस्तानशी सामना केला आहे, ज्यामध्ये 8 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने हरले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. त्याचवेळी, 2010 पासून आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहा सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने पाच सामने जिंकले आहेत.

आशिया कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT