Asia Cup 2023 pakistan cricket-board-chairman-najam-sethi-big-statement
Asia Cup 2023 pakistan cricket-board-chairman-najam-sethi-big-statement  sakal
क्रीडा

Asia Cup 2023 : BCCI-PCB यांच्यातील वाद आणखी चिघळला! पाकच्या क्रिकेट बोर्ड अध्यक्षांनी पुन्हा दिली धमकी

Kiran Mahanavar

PCB Chairman Statement Asia Cup 2023 : पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेट संघासाठी आशिया कप हा चर्चेचा विषय ठरला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही हे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पाकिस्तानकडून असेही बोलले जात आहे की, असे झाल्यास पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्येही खेळायला येणार नाही. या सगळ्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषकाबाबत वक्तव्य केले आहे. सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून भारतीय संघ ज्या प्रकारे पाकिस्तानात येण्यास नकार देत आहे, त्याच प्रकारे पाकिस्तानही भारतात येण्यास नकार देईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला यासंदर्भात बैठकही झाली होती, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता आयसीसीची पुढील बैठक 18 ते 20 मार्च दरम्यान दुबईत होणार आहे. अशा परिस्थितीत मी या बैठकीत हा मुद्दा नक्कीच मांडणार असल्याचे सेठी यांनी सांगितले. एवढेच नाही तर 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही सेठीने भारताला धमकी दिली. ते म्हणाले की हे केवळ आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दल नाही तर 2025 मध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT