India vs Pakistan T20 Asia Cup 2022 sakal
क्रीडा

IND vs PAK Asia Cup T20 : भारत-पाक सामना कुठे 'फ्री' पहायचा तो जाणून घ्या...

आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.

Kiran Mahanavar

IND vs PAK Asia Cup T20 : आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. आठ दिवसांत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 फेरीतील हा पहिला सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने गट फेरीत दोन सामने जिंकले. त्याचवेळी पाकिस्तानने शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला.

याआधीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. टीम इंडियाला हाच फॉर्म कायम ठेवायचा आहे. 28 ऑगस्टच्या विजयापूर्वी भारताने 2016 मध्ये पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात नऊ विकेट्स राखून पराभव केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कुठे, कधी आणि किती वाजता होणार आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ४ सप्टेंबरला नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स वर पाहू शकता.

हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता या स्पर्धेचे सामने पाहू शकता.

भारत संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT