Asia Cup in Pakistan
Asia Cup in Pakistan 
क्रीडा

Asia Cup in Pakistan : आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावले जाणार ? कुठे होणार स्पर्धा...

सकाळ डिजिटल टीम

Asia Cup in Pakistan : BCCI सचिव जय शाह आणि PCB चेअरमन नजम सेठी यांची शनिवारी बहरीनमध्ये आशिया कप २०२३ संदर्भात पहिली औपचारिक बैठक झाली. यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारताने नकार दिल्यानंतर ही बैठक पार पडली.  

या बैठकीनंतर आशियाई क्रिकेट परिषद (ACC) मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाण ठरवेल. या बैठकीत अद्याप कोणताही मोठा निर्णय झालेला नाही. मात्र भारत पाकिस्तानमध्ये न जाण्यावर ठाम आहे. 

आशिया चषक सप्टेंबरमध्ये होणार आहे, ज्याचे यजमानपद पाकिस्तानमध्ये आहे. पण आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेणे जवळपास निश्चित झाले आहे. मार्चमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत आशिया कप स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावेळी आशिया कप युएईमध्ये होऊ शकतो. श्रीलंका हाही पर्याय आहे, पण युएईचा दावा मजबूत आहे. 

बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर न पाठवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला आशिया चषकाचा हट्ट सोडावा लागणार आहे. 

दरम्यान, नुकत्याच बहरीनमध्ये झालेल्या एशियन क्रिकेट काऊन्सीलच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नमज सेठी आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यात जबरदस्त खडाजंगी झाल्याचे समजते.

एका एसीसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 'बैठकीत तू तू मैं मैं झाल्याने शहा आणि सेठी यांच्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नजम सेठी हे जय शहा यांच्याशी उर्मटपणे बोलत होते. ते पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपसाठी भारतात येणार नाही अशी धमकी देत होते.'

बैठकीवेळी काय झालं?

- बीसीसीआयने स्पष्ट केलं की आमचे सरकार पाकिस्तानात संघ पाठवण्यास परवानगी देणार नाही.

- बीसीसीआयला त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानशी खेळण्यात कोणतीच अडचण नाहीये.

- जर पाकिस्तान त्रयस्थ ठिकाणी आशिया कप आयोजित करण्यास तयार झाले तर स्पर्धा अबु धाबी, दुबई आणि शारजाहमध्ये आयोजित करण्यात येईल.

- पीसीबीने एसीसीला सांगितले की आशिया कप पाकिस्तानमधून बाहेर हलवण्याबाबत आम्हाला पाकिस्तान सरकारसोबत याबाबत बोलून त्यांची परवानगी घ्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT