(Asian Games 2022 Viswanathan Anand to mentor Indian chess team)
(Asian Games 2022 Viswanathan Anand to mentor Indian chess team) esakal
क्रीडा

आशियाई स्पर्धेत विश्वनाथन आनंद असणार मेंटॉरच्या भुमिकेत

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : यंदाची आशियाई स्पर्धा २०२२ (Asian Games 2022) चीनमध्ये १० सप्टेंबर पासून सुरू होत आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशनला (All India Chess Federation) त्यांचे पुरूष आणि महिला संघ आशियाई स्पर्धेत मेडल पदक जिंकतील अशी आशा आहे. यासाठी फेडरेशनने दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला (Viswanathan Anand) एक वेगळी भुमिका देऊ केली आहे. (Asian Games 2022 Viswanathan Anand to mentor Indian chess team)

ऑल इंडिया चेस फेडरेशनने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, 'आम्ही आशियाई स्पर्धेत आमचे चार सुवर्ण पदके जिंकण्याचे टार्गेट असेल. त्यासाठी आम्ही दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला (Viswanathan Anand) एक वेगळी भुमिका देणार आहोत. तो आता संघाचा मेंटॉर असणार आहे. खेळाडूंचे त्याच्यासोबतचे पहिले सत्र पुढच्या गुरूवारपासून सुरू होईल.'

2010 मध्ये झालेल्या गुआंगझोऊ गेम्समध्ये भारताला फक्त दोन कांस्य पदके जिंकता आली होती. मात्र आता ऑल इंडिया चेस (Chess) फेडरेशनने स्पर्धेची तयारी लवकर सुरू केली आहे. त्यांनी १० पुरूष आणि १० महिल खेळाडूंचा संभाव्य संघ देखील निवडून ठेवला आहे.

हे संघ खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय रँकिंग लक्षात घेऊन निवडला आहे. पुरूष संघात वैदित गुजराथी, पी हरीकृष्णा, निहाल सरिन, एस.एल नारायणन, के. ससिकिरण, बी. अधिबन, कार्तिकेयन मुरली, अर्जुन इरिगासिस, अभिजीत गुप्ता आणि सूर्या शेखर गांगुली यांचा समावेश आहे. तर महिलांच्या संघात के. हम्पी, डी. हरिका, वैशाली आर., तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, वनतिका अग्रवाल, मेरी अॅन गोमेज, सौम्या स्वामिनाथन आणि इशा करवडे यांचा समावेश आहे.

निवड समितीत अभिजीत कुंटे, देबयांदू बारूओ आणि दिनेश शर्मा यांचा समावेश होता. ही निवडसमिती एप्रिलमध्ये अंतिम पाच खेळाडूंची नावे जाहीर करतील. आशियाई स्पर्धेत बुद्धीबळाचे सामने ११ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. हे सामने दोन फॉरमॅटमध्ये खेळले जाणार आहेत. पुरूष आणि महिलांचे वैयक्तिक रॅपिड टाईम कंट्रोल सामने ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळले जातील. तर पाच सदस्यांच्या संघाचे सामने स्टँडर्ड टाईम कंट्रोलनुसार सप्टेंबर १६ ते २४ दरम्यान पार पडतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT