Asian Games 2023 Cricket Schedule sakal
क्रीडा

Team India: धोनीच्या लाडक्या ऋतुराजची अग्निपरीक्षा! आशियाई गेम्स स्पर्धेचे टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर

Kiran Mahanavar

Asian Games 2023 Cricket Schedule : भारतीय क्रिकेट संघाला आगामी काळात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. जिथे वरिष्ठ संघ आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. त्याचबरोबर चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेची जबाबदारी ज्युनियर संघावर सोपवण्यात आली आहे.

ऋतुराज गायकवाड या संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत. भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळाला. महिला आणि पुरुष दोन्ही स्पर्धांच्या तारखाही जाहीर झाल्या. आता याच दरम्यान भारतीय पुरुष संघाच्या सामन्यांचे वेळापत्रकही समोर आले आहे.

टीम इंडिया सलग तीन दिवस खेळणार

टीम इंडियाला सलग तीन दिवस उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी खेळायची आहे. पुरुषांच्या स्पर्धेत 18 संघ सहभागी होतील तर महिलांच्या स्पर्धेत 14 संघ खेळतील. महिला क्रिकेट स्पर्धा 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. टीम इंडियाच्या महिला संघाचे सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

दुसरीकडे, थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरी गाठल्यास त्यांना सलग तीन सामने खेळावे लागू शकतात. भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बाद फेरीत थेट खेळणार आहे.

भारताची उपांत्यपूर्व फेरी अफगाणिस्तान किंवा बांगलादेशच्या द्वितीय श्रेणी संघाशी होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देशांचे प्रमुख संघ भारतात सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात एकाच वेळी असतील. हँगझोऊ गेम्समध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात एकूण 32 सामने होतील, त्यापैकी 18 पुरुष आणि 14 महिलांसाठी असतील. जर भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत खेळला तर त्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजल्यापासून (स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता) सामने खेळावे लागतील.

आशियाई खेळ 2023 साठी टीम इंडियाचे वेळापत्रक

  • 5 ऑक्टोबर - उपांत्यपूर्व फेरी

  • 6 ऑक्टोबर - उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास)

  • 7 ऑक्टोबर - अंतिम (पात्र असल्यास)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT