Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : हरमनप्रीत सिंग अन् लवलिनाला मिळणार 'ध्वजधारक' होण्याचा मान; कारण आहे खास

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : चीनमधील हांगझाओ येथ 23 सप्टेंबरपासून एशियन गेम्सला सुरूवात होणार आहे. या दिवशी एशियन गेम्सचा उद्घाटन सोहळा होणार असून यासाठी भारतीय खेळाडूंच्या समुहाचे नेतृत्व हे भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेन करणार आहेत. या दोघांना एशियन गेम्समध्ये भारताचे ध्वजधारक होण्याचा मान मिळणार आहे.

आज (दि. 20) इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेतृत्व हे हमरमनप्रीत सिंग आणि लवलिना बोरगोहेन संयुक्तरित्या करतील असा निर्णय घेतला. एशियन गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या समुहात एकूण 655 खेळाडूंचा समवेश आहे. हा आतापर्यंतचा भारताचा एशियन गेम्समधील सर्वात मोठा चमू आहे.

एशियन गेम्समधील भारतीय खेळाडूंच्या समुहाचे प्रमुख भुपेंद्र सिंग बाजवा यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'आम्ही आज हा निर्णय ठरवून घेतला आहे. यावेळी भारतीय खेळाडूंच्या चमूचे दोन ध्वजधारक असतील. पुरूष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लवलिना बोरगोहेन हे दोघे ध्वजधारक असतील.'

जकार्ता एशियन गेम्स 2018 च्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला ध्वजधारक होण्याचा मान मिळाला होता. यंदा लवलिना आणि हरमनप्रीत सिंग यांना हा मान मिळणार आहे. लवलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. ती यावर्षी 75 किलो वजनी गटात आपली दावेदारी सादर करणार आहे.

हरमनप्रीत सिंग हा देखील भारताचा एक अव्वल दर्जाचा हॉकीपटू आहे. तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरूष हॉकी संघाचा सदस्य होता. हॉकी संघाने जवळपास 4 दशकांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवला होता. यंदाच्या हांगझाओ एशियन गेम्समध्ये हॉकी संघ सुवर्ण पदक पटकावण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT