Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : जलतरण पुरूष 4 बाय 100 मीटर प्रकारात भारतीय संघ पोहचला अंतिम फेरीत

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मध्ये आज भारतीय पुरूष जलतरण संघाने 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. भारताच्या तनिष जॉर्ज, विशाल ग्रेवाल, आनंद अनिलकुमार शैलजा आणि श्रीहरी नटराज यांनी हीटमध्ये 3 : 21.22 सेकंद वेळ नोंदवत हीटमध्ये पाचवे स्थान पटकावले. अंतिम फेरी आज भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी सुरू होणार आहे.

पुरूषांबरोबरच भारतीय महिला 4 बाय 200 मीटर फ्रीस्टाईल रिले जलतरण संघ देखील अंतिम फेरीत पोहचला आहे. भारतीय संघातील धिनिधी, शिवांगी, वरिथी आणि हशिका यांनी आपल्या हीटमध्ये 8 : 39.64 अशी वेळ नोंदवत चौथे स्थान पटकावले होते.

पुरूष 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात हीट 5 मध्ये वीरधवल खाडे 7 व्या तर महिला 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात हीट 2 मध्ये शिवांगी शर्मा ही देखील 7 व्या स्थानावर राहिली.

एशियन गेम्समध्ये आज भारताने आतापर्यंत दोन पदकांची कमाई केली आहे. 60 किलो सांदा वुशू क्रीडाप्रकारात रोशिबिना देवी नाओरेमने रौप्य पदक तर शुटिंगमध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या पुरूष संघाने सुवर्णवेध घेतला. सरबजोत सिंग, अर्जुन सिंह चीमा, शिवा नरवाल यांनी भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं.

आज एशियन गेम्समध्ये इक्वेस्टेरियन (घोडेस्वारी) ड्रेसेज वैयक्तिक प्रकारात भारताचे ह्रदय छेडा आणि अनुश अगरवाल्ला फायनलमध्ये पोहचले आहेत. याचबरोबर रामकुमार रामनाथन आणि साकेत मयनेनी हे देखील टेनिस पुरूष दुहेरीत अंतिम फेरीत पोहचले आहेत. त्यामुळे त्यांचे पदक निश्चित आहे.

तसेच रवि बोपन्ना आणि ऋतुजा भोसले हे देखील मिश्र दुहेरीची सेमी फायनल खेळणार आहेत. जर त्यांनी आजचा सामना जिंकला तर ते रौप्य पदक निश्चित करतील.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT