क्रीडा

क्रीडापटूंनी कोरोनाचे कारण दिल्यास येऊ शकते 'इतक्या' वर्षांची बंदी; वाचा काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोनाच्या महामारीचे कारण सांगून उत्तेजक चाचणीसाठी नमूना देण्यास नकार दिल्यास क्रीडापटूवर चार वर्षांची बंदी येऊ शकेल, असा इशारा राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने दिला आहे. त्याचबरोबर चाचणीचा नमुना देताना सुरक्षेचे उपाय न पाळल्यासही कारवाई होणार आहे. 

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने शिबिरात नव्याने दाखल होणाऱ्या क्रीडापटूंची कोरोना चाचणी करतानाच त्यांची उत्तेजक चाचणीही घेण्याचे ठरवले आहे. चाचणीच्या वेळी क्रीडापटूंनी एखादी माहिती जाणूनबुजून लपवल्यास तसेच चाचणीस सहकार्य न केल्यास त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात येते. त्यामुळे कोरोना महामारीचे कारण सांगून चाचणीस नकार दिल्यास चार वर्षांची बंदी येऊ शकेल, असे आधिकाऱ्यांनी सांगितले. 
उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने उत्तेजक चाचणीसाठीचे नियमही तयार केले आहेत. ही चाचणी देताना ग्लोव्हज्‌ तसेच मास्क परिधान करणे बंधनकारक आहे; तसेच चाचणीसाठी नमुना देताना हात निर्जंतुक न केल्यासही कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन कालावधीत उत्तेजक चाचणी घेणे थांबवण्यात आले होते. आता राष्ट्रीय क्रीडा शिबिरांना सुरुवात होत आहे. त्यामुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची शक्‍यता असलेल्या खेळाडूंसह आघाडीच्या क्रीडापटूंची चाचणी करण्याचा निर्णय झाला आहे. 

कोरोनावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडली; मुंबई विद्यापीठाचं विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष..

उत्तेजक चाचणी घेताना खेळाडू किंवा आधिकाऱ्यास कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी उपाय केले आहेत. चाचणीचे नमुने घेण्यासाठी जाणार असलेल्या अधिकाऱ्यांनी सकाळी आपल्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तसेच कोरोना झालेल्या किंवा त्याबाबतच्या चाचणीस सामोरे गेलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो नसल्याचे लिहून देणे बंधनकारक आहे. चाचणीचे नमुने घेणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच मधुमेह, हृदयविकार अथवा अन्य कोणताही आजार असलेल्यांना हे काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ही चाचणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नियमितपणे कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. 
अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, तसेच त्यांच्यापासून खेळाडूंना बाधा होऊ नये, यासाठी सध्या तरी ऑलिंपिकमध्ये खेळण्याची शक्‍यता असलेले क्रीडापटू तसेच पूर्णपणे इतिहास माहिती असलेल्या खेळाडूंचीच चाचणी होणार आहे. सर्व प्रकारच्या नोंदी असलेले सध्या 110 खेळाडू आहेत. 
राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून होणाऱ्या आगामी काही महिन्यांतील सर्व चाचणींची स्पर्धा नसलेल्या कालावधीतच गणना होणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंचे रक्त नमुने सध्या घेतले जाणार नाहीत. राष्ट्रीय उत्तेजक चाचणी संस्थेच्या प्रयोगशाळेस अद्याप मान्यता नाही आणि रक्ताचे नमुने तीन 
दिवसांत कतार किंवा बेल्जियममधील प्रयोगशाळेत पाठवणे अशक्‍य आहे. 


पतियाळापासून सुरुवात 

सध्या भारताचे ऍथलीटस्‌ पतियाळात आहेत. त्याचबरोबर वेटलिफ्टर्सचाही मुक्काम तेथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत आहे. त्यांची चाचणी करून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ह्‌ अधिकारी प्रामुख्याने हवाई प्रवास टाळणार आहेत. त्यामुळे रस्ता मार्गाने जाता येईल, त्याच खेळाडूंची घरी जाऊन चाचणी होईल. बंगळूर येथील भारतीय क्रीडा केंद्रात ऍथलीटस्‌ तसेच भारतीय हॉकीपटू आहेत. त्यांची चाचणी नजीकच्या कालावधीत होण्याची शक्‍यता कमी आहे. 

उत्तेजक चाचणीपूर्वी कोरोना चाचणी 

उत्तेजक चाचणी होण्यापूर्वी खेळाडूंना आपल्याला कोरोनाची साथ नसल्याचे सांगणे भाग आहे. ही चाचणी देताना सुरक्षित अंतर बंधनकारक असेल, पण त्याच वेळी अधिकाऱ्यांनी खेळाडू सर्व नियमांचे पालन करूनच चाचणी देत आहेत, याकडे लक्ष देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT