Ashes Record steve smith Sakal
क्रीडा

Ashes Record : स्मिथच्या नावे खास विक्रमाची नोंद

सुशांत जाधव

सिडनी : ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात रंगला आहे. इंग्लंडचा पहिला डाव 294 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 6 बाद 265 धावांवर घोषीत केला. त्यांनी इंग्लंडसमोर 388 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा उप कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ने सिडनीच्या मैदानात खास विक्रम नोंदवला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या स्मिथला दुसऱ्या डावात 23 धावाच करता आल्या. पण या 23 धावांसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातलीये. अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Test) 3 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये तो सामील झालाय.

स्मिथच्या आधी दिग्गज क्रिकेटर डॉन ब्रॅडमन, जॅक हॉब्स, एलन बॉर्डर, स्टीव वॉ आणि डेविड गॉवर यांनी असा पराक्रम करुन दाखवला होता. ब्रॅडमन यांनी अ‍ॅशेसमध्ये 89.78 च्या सरासरीनं 5028 धावा केल्या आहेत, हॉब्सच्या नावे 54.26 सरासरीनं 3636 धावा, बॉर्डर यांच्या खात्यात 55.55 च्या सरासरीनं 3222 धावा, स्टीव वॉच्या खात्यात 58.75 च्या सरासरीनं 3173 धावा तर गॉवर यांच्या खात्यात 46.01 सरासरीनं 3037 धावांची नोंद आहे.

स्मिथनं अ‍ॅशेस मालिकेत 61.57 च्या सरासरीनं 3017 धावा केल्या आहेत. त्याने 31 सामन्यातील 54 डावात 3 हजारीचा टप्पा पार केलाय. यादरम्यान स्मिथनं 11 शतक आणि 11 अर्धशतक ठोकली आहेत. 239 ही त्याची अ‍ॅशेसमधील सर्वोच्च खेळी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT