Brett Lee  Twitter
क्रीडा

'बाप बाप होता है'; ब्रेट लीचा खतरनाक यॉर्कर; व्हिडिओ व्हायरल

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियाचा माजी जदगती गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याने अजूनही आपल्यातील धमक कायम ठेवलीये. चेंडू हातात आला रे आला की यॉर्कर टाकल्याशिवाय तो काही गप्प बसत नाही. मग पुढे कोणीही असो... ब्रेटलीचा भाऊन शेन ली याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत ब्रेटलीचे जुने तेवर पाहायला मिळतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

या व्हिडिओमध्ये ब्रेट ली आपला मुलगा प्रेस्टन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत फ्रंट यार्ड क्रिकेट खेळताना दिसून येते. त्याने परफेक्ट यॉर्करवर आपल्या मुलाच्याच दांड्या उडवल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळते. ब्रेट लीने टाकलेल्या चेंडूवर त्याच्या मुलाला बचाव करण्याची अजिबात संधी मिळाली नाही. ब्रेटलीने बोल्ड काढल्यावर त्याचा मुलगा रागाने बॅट फेकताना दिसते.

सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. ऑस्ट्रेलियन माजी जलदगती गोलंदाजाच्या या यॉर्कर चेंडूवर अने प्रतिक्रियाही उमटताना दिसते. ब्रेट लीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 76 कसोटी सामन्यात 310 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याच्या नावे 380 बळींची नोंद आहे. वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादी ब्रेटली आणि ग्लेन मेग्रा संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत.

भारताविरुद्ध 1999 मध्ये ब्रेट लीने बॉक्सिंग डे कसोटीतून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. 2003 आणि 2007 वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो सदस्यही राहिला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत दिसतो. त्याचा भाऊ शेन ली याने 1995 ते 2001 दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून 55 वनडे सामने खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT