Australia Cricket Team Reached in Pakistan
Australia Cricket Team Reached in Pakistan esakal
क्रीडा

भीतीदायक वातावरणात ऑस्ट्रेलिया पोहचली पाकिस्तानात

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानात दाखल (Australia Tour Of Pakistan) झाला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया (Australia) पाकिस्तानबरोबर 3 कसोटी, 3 वनडे आणि 1 टी 20 सामना खेळणार आहे. मालिकेचा पहिला सामना 4 मार्चपासून रावळपिंडीत सुरू होईल तर दौऱ्याची सांगता 5 एप्रिलला होईल. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने 1998 मध्ये पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया नंतर इंग्लंडही पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेट (Pakistan Cricket) रूळावर आणण्याच्या प्रयत्नांना चांगलेच बळ मिळाले आहे. मात्र या दौऱ्यावर दहशतवादाचे सावट कायम असणार आहे.

पाकिस्तान दौऱ्यावर असणाऱ्या श्रीलंकेच्या संघावर 2009 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटला ब्रेक लागला. अनेक संघ पाकिस्तानात जाण्याचे टाळत होते. त्यामुळे पाकिस्तानला अनके देशांबरोबर त्रयस्त ठिकाणी सामने खेळावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने देखील पाच वर्षापूर्वी लाहोरमधील चर्चवर आत्मघातकी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मायदेशीत क्रिकेट (Cricket) पुन्हा सुरू करण्यासाठी कंबर कसली. अनेक छोट्या संघांचा दौरा पाकिस्तानने यशस्वी करून दाखवला. काही महिन्यापूर्वीच न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कराणास्तव अर्ध्यावर सोडला होता.

वनडे मालिकेत अनेक दिग्गजांना विश्रांती

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यात पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे.

पाकिस्तान दौऱ्यावरील ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ

पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅम्बुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजवलूड, अॅश्टन एगर, स्कॉट बॉलेंड, जॉश इग्निस, उस्मान ख्वाजा, मिचेल मार्श, मिचेल नेसर, मिचेल स्वेप्सन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT