Bangladesh vs Australia  Twitter
क्रीडा

कांगारुंच्या अब्रूचं खोबरं; बांगलादेशसमोर 62 धावांत ऑल आउट!

पहिल्यांदा बॅटिंग करताना बांगलादेशच्या संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 122 धावा केल्या होत्या.

सुशांत जाधव

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था केविलवाणी झालीये. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि अखेरच्या सामन्यात बांगलादेशनं पाहुण्या संघाला पुन्हा एकदा गुडघे टेकायला भाग पाडले. पाच सामन्यांच्या मालिकेतील सलग तीन विजयासह बांगलादेशनं मालिका पहिल्यांदाच खिशात घातली होती. या विजयासह बांगलादेशने नवा इतिहासही रचला. त्यानंतर चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सनी विजय नोंदवला. पण पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा त्यांची तारंबळ उडाली. पहिल्यांदा बॅटिंग करताना बांगलादेशच्या संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 122 धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा अख्खा संघ 13.4 षटकात अवघ्या 62 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेथ्यू वेडच्या 22 चेंडूतील 22 धावा आणि बेन मॅकडेरर्मोटच्या 16 चेंडूतील 17 धावा वगळता कांगारुंच्या संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मोहम्मद सैफुद्दीन 3, नसुम अहमद 2 आणि कर्णधार महमुदुल्ल्हाने एक विकेट घेतली.

पहिल्यांदा बॅटिंग करताना बांगलादेशची सुरुवातही फारकाही चांगली झाली नव्हती. मेहंदी हसन आणि नयीम या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 42 धावांची खेळी केली. टर्नरने हसनला अवघ्या 13 धावांवर बाद केले. क्रिस्टियनने नयीमच्या रुपात बांगलादेशला दुसऱा धक्का दिला. त्याने 23 चेंडूत केलेली 23 धावांची खेळी दोन्ही डावातील मिळून सर्वोच्च धावसंख्या ठरली. शकीब 11, सोमय्या सरकार 16, महमुदुल्ल्हा 19 आणि अफिफ हुसेनच्या 10 धावा वगळता अन्य बांगलादेशच्या खेळाडूला दुहेरी आकड्यापासून वंचितच रहावे लागले. पण त्यांनी निर्धारित 20 षटकात 122 धावांपर्यंत मारलेली मजलही त्यांना मोठा विजय देऊन गेली. बांगलादेशने अवघ्या 60 धावांनी विजय नोंदवला. मालिका आधीच गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा बांगलादेशसमोर नामुष्की आढावली.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये निच्चांकी धावसंख्येचा नकोसा विक्रम तसा 21 धावांचा आहे. तुर्की आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील सामन्यात 30 ऑगस्ट 2019 मध्ये तुर्कीचा डाव 8.3 षटकात 21 धावांत आटोपला होता. पण कसोटी खेळणाऱ्या संघांवर बिकट वेळ येणारा ऑस्ट्रेलिया हा तिसराच संघ आहे. 8 मार्च 2019 मध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिजच्या संघाला 11.5 षटकात 45 धावांत रोखले होते. त्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने 1 एप्रिल 2018 मध्ये 13.4 षटाकात वेस्ट इंडिजचा खेळ 60 धावांत खल्लास केला होता. निच्चांकी धावसंख्येची नोंद असलेल्या संघामध्ये न्यूझीलंडचाही समावेश आहे. 31 मार्च 2014 श्रीलंकने न्यूझीलंडला 15.3 षटकात 60 धावांवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT