Australia vs South Africa World Cup Semi Final sakal
क्रीडा

AUS vs SA : अख्ख्या वर्ल्ड कपचा हीरो एका चुकीमुळे ठरला 'चोकर्स'चा बादशाह... ऑस्ट्रेलियाविरुद्ध आफ्रिका सेमीफायनलच्या आठवणी जाग्या

Kiran Mahanavar

Australia vs South Africa World Cup Semi Final : वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर आज 16 नोव्हेंबर (गुरुवार) रोजी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात आमनेसामने असतील. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहेत.

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये चार वेळा उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या दक्षिण आफ्रिकाच्या संघाला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 'चोकर्स' म्हणजेच दबावाखाली गळपटणारा संघ, अशी नकोशी वाटणारी ओळख झाली आहे. पण हा टॅग कधी मिळाला त्यांच्या मागचा एक मोठा किस्सा आहे.

1999 मध्ये दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या अगदी जवळ आला होती, पण चॅम्पियन खेळाडूच्या एका छोट्याशा चुकीने आफ्रिकन संघाला वर्ल्ड कप फायनल खेळण्याची इच्छा धुळीला मिळाल्या. वर्ल्ड कपमधील ही घटना प्रत्येक क्रिकेटप्रेमीला कदाचित आठवत असेल, 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 1 धाव घेताना कशी चूक केली आणि संघाचा खेळ खल्लास झाला.

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये दुसरा उपांत्य सामना बर्मिंगहॅम येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले या सामन्यात कोणत्याही संघाला विजय मिळवता आला नाही.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि शॉन पोलॉकच्या (36/5) शानदार गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियाला 213 धावांत गुंडाळले.

एक चूक दक्षिण आफ्रिकेला पडली महागात

त्या वर्ल्ड कपध्ये लान्स क्लुसनरने अविस्मरणीय कामगिरी केली होती. त्याने खऱ्या अर्थानि अष्टपैलू चमक दाखवली. आफ्रिकेस उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला, पण तो लक्षात राहिला आफ्रिकेच्या पराभवास जबाबदार असल्याबद्दल.

खरं तर अखेरच्या षटकात झालेल्या चुकीला क्लुसनर जबाबदार असेलही, पण संघाला विजय मिळवून देण्याची परिस्थिती त्यानेच निर्माण केली होती. ऑस्ट्रेलियाच्या 213 धावांसमोर आफ्रिकेची अवस्था 44.5 षटकांत 6 बाद 175 असताना क्लुसनर मैदानात आला. त्यानंतर त्याने 16 चेंडूत 31 धावा फटकावल्या.

अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 9 धावांची गरज होती, त्याच्या 9 विकेट पडल्या होत्या. शेवटची जोडी म्हणून लान्स क्लुजनर आणि अॅलन डोनाल्ड ही जोडी क्रीजवर होती. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीसाठी आला डॅमियन फ्लेमिंग. त्याला लान्स क्लुसनरने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारून सामना दक्षिण आफ्रिकेकडे वळवला. त्याची सुरवात, तर झकास झाली होती. पण, माशी शिंकली. डोनाल्डने धाव घेण्यासाठी क्लुसनरने दिलेला कॉल ऐकलाच नाही आणि सर्व कामगिरीवर पाणी फिरले.

चौथ्या चेंडूवर, क्लुसनरने मिड-ऑनच्या दिशेने एक शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी पळला, परंतु खराब समन्वयामुळे तो धावबाद झाला. सामना बरोबरीत सुटला आणि चांगल्या नेट रन रेटमुळे ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. आणि आफ्रिकेला चोकर्स म्हणून ओळखले गेले. इतके जवळ येऊनही लान्स क्लूसनर संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि इतिहासाच्या पानांमध्ये अख्ख्या वर्ल्ड कपचा हीरो एका चुकीमुळे 'चोकर्स'चा बादशाह ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT