क्रीडा

पूजा-हरमनप्रीतची मोजकी खेळी ऑस्ट्रेलियन महिला संघाला भारी पडणार?

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर आव्हानात्मक धावसंख्या ठेवली आहे.

सुशांत जाधव

Australia Women vs India Women 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट गमावून 118 धावा केल्या. सलामीची बॅटर स्मृती मानधना 1, शफाली वर्मा 3 आणि जेमिमा रॉड्रिग्ज अवघ्या 7 धावा करुन परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिने 5 चौकाराच्या मदतीने 20 चेंडूत 28 धावा केल्या. यस्तिका भाटिया 8 आणि रिचा घोष 2 धावा करुन परतल्यानंतर दीप्ती आणि पूजानं संघाच्या डावाला आकार देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती लिलया पेलूनही दाखवली.

दीप्तीनं 19 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 16 धावांची अल्प पण महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या बाजूला पूजा वस्त्रारकरने 26 चेंडूत 3 चौकार आणि 2 चौकाराच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. तिने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियासमोर चॅलेंजिग धावसंख्या उभारणे शक्य झाले. शिखा पांड्ये 1 आणि रेणूका सिंग अवघ्या एका धावेची भर घातली.

ऑस्ट्रेलियाकडून व्लामिंक, मोलिनेक्स यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. वेअरहॅम, गार्डनर आणि कॅरीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला होता.

टी-20 मालिकेपूर्वी भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एकमेव कसोटी सामना खेळला. वनडे मालिका 2-1 अशी गमावल्यानंतर ऐतिहासिक पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाने वर्चस्व राखले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT